esakal | रोबोटिक शस्त्रक्रियेतून ‘ऑस्टिओआर्थरायटिस’ मात शक्य; ज्येष्ठांच्या अपंगत्वास कारणीभूत
sakal

बोलून बातमी शोधा

ऑस्टिओआर्थरायटिस

रोबोटिक शस्त्रक्रियेतून ‘ऑस्टिओआर्थरायटिस’ मात शक्य

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : शरीरातील सांधे, स्नायू यांच्यावर विविध कारणांनी येणारी सूज व त्यामुळे होणारा त्रास म्हणजे वातरोग (आर्थारायटिस). वातरोग सांधे व स्नायू याशिवाय डोळे, फुप्फुस, हृदय, मणका, मेंदू आदी अवयवांवरही परिणाम करतो. ज्येष्ठांमध्ये येणाऱ्या अपंगत्वासाठी ऑस्टिओआर्थरायटिस वातरोग कारणीभूत ठरत आहे. ९.६ टक्के पुरुषांमध्ये तर १८ टक्के महिलांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातून स्पष्ट झाले. यामुळे २५ टक्के ज्येष्ठांना रोजच्या जीवनातील दैनंदिन क्रिया करण्यात अडथळा निर्माण होतो. विशेष असे की, रोबोटिक शस्त्रक्रियेतून यावर मात करणे शक्य आहे.

सर्वाधिक आढळणारे वातरोग म्हणजे आमवात व संधिवात. आनुवंशिक, व्हायरल इन्फेक्शन, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव आणि हल्ली तरुण पिढीमध्ये असलेल्या खाण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे हा रोग बहुतेक रोग्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात दिसून येतो. परंतु, काही रुग्णांमध्ये याचे कारणही समजत नाही. वातरोगात सांध्याची झीज होत असल्याचे लक्षात घेत प्रतिबंधात्मक उपाय किंवा गुडघे पूर्णतः झिजले असतील, तर रोबोटिक गुडघे प्रत्यारोपण सारखे आधुनिक शस्त्रक्रियेतील उपचार प्रभावी ठरत असल्याचे डॉ. लढ्ढा म्हणाले.

गुडघ्यांमध्ये असलेल्या कार्टिलेजचा थर झिजल्यास त्याचे कार्यान्वयन बिघडते. कालांतराने अपंगत्व येऊ शकते. ऑस्टिओआर्थरायटिस या वातरोगासाठी वय, रुमॅटॉईड आर्थरायटिस, अपघात आणि गुडघ्यांवर अत्याधिक ताण पडणारे खेळ कारणीभूत ठरू शकतात. गुडघ्यातील झीज पहिल्याच टप्प्यात आढळून आली तर औषधोपचार आणि फिजियोथेरपीसारख्या उपचार प्रणालींमुळे रुग्ण बरा होऊ शकतो. मात्र, गुडघे एकदा जास्त प्रमाणात झिजल्यानंतर गुडघ्यांचे प्रत्यरोपण हाच पर्याय आहे. रोबोटिक सर्जरीतून गुडघ्यांचे अचूकतेने प्रत्यारोपण करणे शक्य आहे, असे डॉ. लढ्ढा म्हणाले.

हेही वाचा: दुहेरी हत्याकांडाने यवतमाळला हादरा; पूर्ववैमनस्यातून काढला काटा

वातरोगाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. ऑस्टिओआर्थरायटिस वातरोगामुळे गुडघे झिजल्यास रुग्णाचे जगणे वेदनादायक होते. अशावेळी जीवन सामान्य राखण्यासाठी गुणवत्ता सुधारण्यासाठी गुडघे प्रत्यारोपण हाच पर्याय आहे. रोबोटिक गुडघे प्रत्यारोपण हा या वातरोगावर प्रभावी ठरतो.
- डॉ. मुकेश लड्ढा, सांधेप्रत्यारोपण शल्यचिकित्सक
loading image
go to top