
आपल्या पायाच्या खालच्या भागात म्हणजेच पोटरी मध्ये वेदना वारंवार होत असेल तर ही एक गंभीर बाब आहे. सहसा ही वेदना स्नायूंच्या उबळपणामुळे किंवा ताणल्यामुळे उद्भवते, परंतु या वेदनामागे अनेक कारणे आहेत. जेव्हा डॉक्टरांना त्याची लक्षणे समजत नाहीत तेव्हा त्यामागील कारण शोधण्यासाठी रक्त तपासणी किंवा अल्ट्रासाऊंड स्कॅन करण्याची शिफारस करतात. त्याच वेळी, जर वेदना किरकोळ असेल तर ही थेरपी किंवा आईस-क्युरिंग या मार्गाद्वारे वेदनांवर उपचार करण्यात येतात.
स्नायूंवर ताण
पोटऱ्याच्या स्नायूंमधील तंतूवर परिणाम झाल्यास स्नायूंवर ताण येतो. स्नायूंवर ताण आल्यास वेगवेगळी लक्षणं दिसून येतात. मात्र बहुतेक लोकांमध्ये पोटऱ्यांच्या स्नायूंमध्ये अचानक तीव्र अशी वेदना जाणवते.
डायबेटिक न्यूरोपॅथी
मधुमेहामुळे नसांना हानी पोहोचल्यास त्याला डायबेटिक न्यूरोपॅथी असं म्हटलं जातं. रक्तातील साखरेची पातळी सातत्याने वाढत असल्यास शरीरातील नसांना हानी पोहोचू शकते आणि याची सुरुवात हातापायांपासून होते आणि यामुळे पोटऱ्यांच्या स्नायूंममध्ये वेदना होतात.
स्नायूंमध्ये क्रॅम्प
स्नायूंमध्ये येणारा क्रॅम्प हा अनेकदा तात्पुरता असतो, मात्र त्यावेळी होणाऱ्या वेदना तीव्र असतात. डिहायड्रेशन, घामामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईट्स कमी होणं, पायांची स्ट्रेचिंग न होणं, भरपूर वेळ शारीरिक कार्य आणि स्नायू कमकुवत असल्यास स्नायूंमध्ये क्रॅम्प येतो.
रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा
पायाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या आकुंचित पावल्या किंवा त्यात अडथळा निर्माण झाल्यास पोटऱ्यांमध्ये तीव्र वेदना जाणवतात. याला आर्टिरिअल क्लॉडिकेशन असं म्हणतात. ही समस्या असलेला व्यक्ती बसलेला असल्यास त्याच्या पोटऱ्यांमध्ये वेदना होत नाहीत, मात्र जेव्हा हा व्यक्ती चालतो तेव्हा त्याच्या पोटऱ्यांमध्ये तीव्र वेदना होतात कारण पायांना योग्य प्रमाणात रक्तपुरवठा होत नसतो.
डिप व्हेन थ्रोम्बोसिस
पायातील नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होता. त्यामुळे पायातील रक्तप्रवाहावर परिणाम होतो, पायांमध्ये तीव्र वेदना होतात. जास्त वेळ बसल्याने, उच्च रक्तदाब किंवा ब्लड क्लॉटिंग डिसॉर्डर (रक्ताच्या गुठळ्या होण्याची समस्या) असल्यास हा आजार होतो. उभं राहिल्याने किंवा चालताना पोटऱ्यांमध्ये तीव्र वेदना होणं हे डिप व्हेन थ्रोम्बोसिसचं लक्षण आहे. पायाच्या ज्या भागाला रक्तपुरवठा होत नाही आहे, तो भाग लाल होतो किंवा सूजतो.
कम्पार्टमेंट सिंड्रोम
कम्पार्टमेंट सिंड्रोममध्ये पोटऱ्यांचे स्नायू किंवा दोन्ही पायांमध्ये तीव्र वेदना जाणवतात. पायांना एखादा अपघात किंवा गंभीर दुखापत झाल्यास कम्पार्टमेंट सिंड्रोम बळावतो. शरीरातील एखाद्या टिश्यूच्या समूहाखालील अति रक्त किंवा द्रव पदार्थाचं नीट प्रसरण होत नसल्यास नसा आणि रक्तवाहिन्यांवर दाब पडतो आणि त्यामुळे तीव्र वेदना, सूज, मुंग्या येणे, तो भाग संवेदनहिन होणे अशी लक्षणं दिसतात.
नसांवर दाब पडणे
पायांकडे जाणाऱ्या नसांवर दाब पडल्यासदेखील पायांच्या पोटऱ्यांमध्ये वेदना होतात. याला न्यूरोजेनिक क्लॉडिकेशन म्हणतात. स्पिनल स्टेनोसिसमुळे न्यूरोजेनिक क्लॉडिकेशन होतं. स्पिनल स्टेनोसिसमध्ये पाठीच्या मणक्यातील हाडांमधील जागा कमी होते आणि त्यामुळे नसांवर दाब पडतो. नसांवर दाब पडल्टयाने चालताना, भरपूर वेळ उभं राहिल्याने, कमरेतून पुढे झुकल्याने पोटऱ्यांमध्ये वेदना जाणवतात. फक्त पोटऱ्यास नव्हे तर मांडी, कंबर आणि नितंबही दुखू लागतं. तसंच व्यक्ती आराम करत असला तरी त्याच्या पोटऱ्यांमध्ये वेदना होत राहतात.
पोटऱ्यांच्या वेदनाची लक्षणे
1 - निळ्या पडणे
2 - कडक वाटणे
3 - जळजळ होणे
4 - अशक्तपणा किंवा वेदना जाणवणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.