किडनीच्या प्रतीक्षा यादीत वाढ!

राज्यात चार हजार रुग्णांना प्रत्यारोपणाची गरज
 kidney disease
kidney diseasesakal
Updated on

मुंबई : मुंबईसह राज्यात सध्या मूत्रपिंडाच्या (किडनी) आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यातून दरवर्षी मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्याची गरज असणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही भर पडत असून, प्रतिक्षा यादी वाढत आहे. क्षेत्रीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राने (झेडटीसीसी) दिलेल्या माहितीनुसार, एकट्या मुंबईतच सध्या तीन हजार ३१९ रुग्ण मूत्रपिंडाच्या प्रतीक्षा यादीत आहेत. राज्यात ४ हजार जणांना मूत्रपिंडाची आवश्यकता आहे.

दरवर्षी त्यात मोठ्या संख्येने वाढ होत आहे. मुंबईत १९९७ पासून २०२१ पर्यंत एकूण ९११ वेळा मूत्रपिंड दान करण्यात आले आहे. मुंबईतील जवळपास ३ हजार ३१३ रुग्णांना मूत्रपिंडाची आवश्यकता आहे. म्हणजेच सरासरी १० पटीने मूत्रपिंडांची आवश्यकता आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, भारतात ६१ टक्के लोक हे जीवनशैलीशी संबंधित आजारांमुळे मरण पावतात. जेवणात मीठ, तेल आणि साखरेच्या अतिप्रमाणामुळे अनेक विकार होण्याची शक्यता असते.

यांना जडू शकतो मूत्रपिंडाचा विकार

जगभरात ३० वर्षांवरील ८ ते १६ टक्के प्रौढांना मूत्रपिंडाचा आजार आहे. भारतात मूत्रपिंड विकाराने ग्रस्त असलेल्यांपैकी ६० टक्के व्यक्तींना मधुमेह किंवा उच्च रक्तदाब आहे. मूत्रपिंड विकाराचे प्रमुख कारण म्हणजे भारतात ७० लाखांच्या आसपास टाइप-२ मधुमेही आहेत. तर, २०४० पर्यंत ही संख्या १४० लाखांपर्यंत पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यातच ३० ते ४० टक्के नागरिकांना मूत्रपिंड विकार होण्याची शक्यता आहे. मधुमेह, उच्च रक्तदाबाचे रुग्ण किंवा ज्यांना मूत्रपिंडाला पूर्वी जंतूसंसर्ग होऊन गेला आहे किंवा मूतखडा झालेला आहे, अशा नागरिकांना लघवी तुंबवल्यामुळे मूत्रपिंडाला जंतूसंसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. यामध्ये महिलांचा प्रामुख्याने समावेश होतो.

मूत्रपिंडविकार होऊ नये म्हणून काय कराल?

मूत्रपिंडविकार हा बऱ्याचदा अंतिम टप्प्यात पोहोचल्यावरच लक्षात येतो. म्हणूनच योग्य वेळी लक्षण जाणा आणि धोका टाळा, असे तज्ज्ञ सांगतात. त्यासाठी दर १५ मिनिटांनी एक वाटी पाणी प्यावे, एकेक तासाला लघवी करावी, सतत पेनकिलर्स घेतल्यानेही किडनीविकार उद्भवतात. त्यामुळे प्रोटिन्सचे अधिक सेवन टाळावे. संसर्गामुळे काही आजार झाले असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. रक्तातील वाढलेले साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी गोड खाण्यावर नियंत्रण ठेवा. योग्य दिनचर्या, व्यायाम व आहार यामुळे किडनीसह सर्वच विकारांना प्रतिबंध घालता येतो.

मूत्रपिंडविकारांची लक्षणे

  1. मूत्रविसर्जनात बदल होणे

  2. मूत्रविसर्जनाच्या प्रक्रियेत त्रास होणे

  3. फेसाळ मूत्र विसर्जन होणे

  4. मळमळणे व उलट्या होणे धाप लागणे

  5. मूत्रासोबत रक्त जाणे, सूज येणे

  6. अतिशय थकवा जाणवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com