फिजिओथेरपी आरोग्य टिप्स, आरोग्यदायी जीवनाचा कानमंत्र!

फिजिओथेरपी आरोग्य टिप्स, आरोग्यदायी जीवनाचा कानमंत्र!
फिजिओथेरपी
फिजिओथेरपीSakal
Summary

सध्याच्या ताणतणावाच्या काळात एक चांगली जीवनशैली ही अत्यंत महत्त्वाची गरज बनली आहे.

सध्याच्या ताणतणावाच्या काळात एक चांगली जीवनशैली (Good lifestyle) ही अत्यंत महत्त्वाची गरज बनली आहे. शारीरिक ताण, धावपळ, मानसिक दबाव अशाप्रकारच्या अनुभवातून प्रत्येक व्यक्ती जात असते. तेव्हा प्रत्येकाला या संकटातून मुक्त करण्याचा प्रयत्न करावा लागतो. तेव्हा एक चांगली जीवनशैली हे प्रश्‍न कायमचे संपवण्यासाठी उपयोगी ठरू शकते. कोणत्याही स्थितीत प्रश्‍न अथवा अडचणी या सक्षम जीवनशैलीचे प्राधान्य असल्यास कधीच त्रासदायक ठरणार नाहीत. उदाहरणार्थ, नियमित व्यायामाने अनेक संभाव्य आजार जवळच येत नाहीत. हे अप्रत्यक्ष लाभ आपण जीवनशैलीतून मिळवतो.

कोरोनासारख्या (Covid-9) आजारात उत्तम व्यायामाची जीवनशैली अत्यंत प्रभावी ठरली. कोरोनाकाळात ही मार्गदर्शक सूत्री जशी महत्त्वाची ठरली तसे अपघात अथवा तत्सम काही कारणांमुळे शारीरिक अडचणी आल्या तर फिजिओथेरपीचे (Physiotherapy) महत्त्व अधोरेखित होत आहे. अशा फिजिओथेरपीमुळे अनेकांच्या जीवनात कायापालटही झाला आहे.

फिजिओथेरपीस्ट डॉ. विनोद शेळके यांनी दिलेल्या आरोग्यदायी जीवनाच्या टिप्स...

 • तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नियमित व्यायाम, प्राणायाम, ध्यान, योगा, करणे

 • दररोज सात ते आठ तास झोप घेणे

 • नियमित चालणे, धावणे, सायकल चालवणे, पोहणे, नृत्य करणे

 • दररोज सकस आहार घेणे

 • दुग्धजन्य पदार्थ, ताजी फळे व भाज्यांचे सेवन करणे

 • साखर व मीठ योग्य प्रमाणात सेवन करणे

 • फास्टफूड टाळणे

 • चिडणे, रागावणे टाळणे

 • धूम्रपान टाळणे

 • स्क्रिन टाइम कमी करणे (मोबाईल, कॉम्प्युटर, टीव्ही)

 • वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवणे

 • ट्रॅफिक नियमांचे पालन करणे

 • नियमित आरोग्य तपासणी करणे

 • जास्तीत जास्त हसणे

 • मानसिक व शारीरिक तणाव कमी करणे

 • नियमित वाचन करणे

 • सर्व सांधे व स्नायूंचे स्ट्रेचिंग करणे

 • दररोज चार लिटर पाणी सेवन करणे

 • खूप वेळ बसणे व उभे राहणे टाळणे

 • कोणताही आजार व इजा झाल्यास तज्ञांच्या सल्ल्याने इलाज करणे

 • लवकर झोपणे व लवकर उठणे

 • योग्य आराम करणे

 • नैसर्गिक जीवनशैलीचा अवलंब करणे

 • शारीरिक समस्यांकडे दुर्लक्ष करणे टाळणे

 • आवश्‍यक लसीकरण करणे

 • नेहमी ऍक्‍टिव्ह राहणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com