न्यूमोनियाने दगावतात शंभरात तीन मुले; चांगल्या ॲन्टिबायोटिकमुळे नियंत्रण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pneumonia Vaccine

Pneumonia Awareness Day : न्यूमोनियाने दगावतात शंभरात तीन मुले

नागपूर : न्यूमोनिया हा आजार सहसा थंडीच्या मोसमात लहान मुलांना मोठ्या प्रमाणात होतो. हिवाळ्यात ब्रांको न्यूमोनिया प्रमाण वाढते. पूर्वी न्यूमोनियाच्या मृत्यूचा दर २० टक्क्यांवर होता. परंतु, अलीकडे चांगल्या औषधांपचारातून मृत्यूदरावर बरेच नियंत्रण आले आहे. लहान मुलांमध्ये पूर्वी मृत्यूदर ६ टक्क्यांपेक्षा जास्त होता. अलीकडे १०० पैकी ३ मुले दगावण्याची शक्यता आहे, असा सूर वैद्यक तज्ज्ञ यांच्याशी केलेल्या चर्चेतून पुढे आला.

सहज प्रतिबंध आणि उपचार करण्याजोगा असूनही न्यूमोनिया हा लहान मुलांमधील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. लसीकरण आणि अन्य प्रतिबंधात्मक उपायांमुळे न्यूमोनियामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी होत असले, तरी अजून यावर खूप काम होणे गरजेचे आहे. गरिबीत राहणाऱ्या लोकांना न्यूमोनियाचा धोका अधिक आहे, असे प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. विजय धोटे यांनी सांगितले.

हेही वाचा: रश्मी देसाईचा ट्यूब ब्रामध्ये बोल्ड फोटोशूट

मधुमेही प्रौढांना सर्वाधिक धोका

केवळ लहान मुलेच नाहीत तर प्रौढ व्यक्तींनाही न्यूमोनियाचा धोका आहे. हृदयरोग, मधुमेह असलेल्यांना न्यूमोनियाचा संसर्ग झाल्यास शरीरात गुंतागुंत होण्याची भीती आहे. न्यूमोनियाचे बरेच प्रकार आहेत. दक्ष राहून यातील कोणतीही लक्षणे आढळल्यास फिजिशियन किंवा अन्य आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. गंभीर न्यूमोनिया झालेल्या २० प्रौढांपैकी एक जण दगावण्याची शक्यता असते, असे डॉ. धोटे म्हणाले.

न्यूमोनियाची लक्षणे

 • ताप

 • थंडी वाजणे

 • खोकला

 • श्वास घेण्याची गती वाढते

 • श्वास घेताना धाप लागणे

 • छातीत आणि पोटात दुखणे

 • उलट्या

 • जिवाणूजन्य न्यूमोनिया हळुवारपणे किंवा एकाएकी उत्पन्न होतो

हेही वाचा: एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याचा खून

गंभीर न्यूमोनिया रुग्णामधील लक्षणे

 • हुडहुडी भरणे

 • तीव्र ताप

 • छातीत दुखणे

 • अपुरा श्वास

 • खोकल्यातून पिवळा, तपकिरी कफ

बालकांना सहा महिने मातेचे दूध, नियमित लसीकरण, स्वच्छ वातावरण, घरातील स्वच्छता, पोषक आहारामुळे बालमृत्यूचा दर कमी करणे शक्य आहे. यातूनच न्यूमोनियाचे प्रमाणही नक्कीच कमी होत आहे. कुपोषित मुलांना न्यूमोनियात जीवहानी अधिक होते.
- डॉ. विजय धोटे, प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ, नागपूर
loading image
go to top