esakal | 'पोस्ट कोविड सिंड्रोमवर वेळीच उपचार करणं गरजेचं'; डॉक्टरांचा सल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

'पोस्ट कोविड सिंड्रोमवर वेळीच उपचार करणं गरजेचं'

'पोस्ट कोविड सिंड्रोमवर वेळीच उपचार करणं गरजेचं'

sakal_logo
By
शर्वरी जोशी

कोरोनावर मात केलेल्या अनेकांमध्ये सध्या पोस्ट कोविडची लक्षणं उद्भवत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्येच सध्या पोस्ट कोविड सिंड्रोम रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. विशेष म्हणजे कोविडवर मात केल्यानंतर जाणवत असलेल्या या समस्यांमध्ये अनेक दीर्घकालीन लक्षणांचा समावेश असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये तीव्र थकवा, श्वास घेण्यास अडचण येणे, वास न येणे, एकाग्रतेसंबंधी समस्या, चिंता, नैराश्य, निद्रानाश आणि पचनसंस्थेशी निगडीत समस्या प्रामुख्याने जाणवत आहेत. त्यामुळेच पोस्ट कोविड सिंड्रोमवर वेळीच उपचार करणं गरजेचं असल्याचं मत मुंबईतील डॉ. महाजन हॉस्पिटलमधील रिजनरेटिव्ह मेडिकल रिसर्चर डॉ. प्रदिप महाजन यांनी व्यक्त केलं आहे. (post-covid-syndrome-increased-anxiety-fatigue-pain-respiratory-problems-in-patients)

पोस्ट कोविड काळात हृदयाच्या स्नायू आणि रक्त वाहिन्यांना सूज येऊ शकते. तसेच रक्तवाहिन्यादेखील खराब होऊ शकतात. रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. रक्ताच्या गुठळ्यामुळे मायक्रोथ्रोम्बोसिस होऊ शकतो. संभाव्य परिणामामध्ये स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका किंवा मूत्रपिंड निकामी होण्याची शक्यता असते. म्हणूनच, पोस्ट कोविडची लक्षण जाणवल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

“कोविड पोस्ट सिंड्रोमच्या उपचारांसाठी प्लेटलेट लाइसेटच्या वापराबद्दल मी विशेष सकारात्मक आहे. प्लेटलेटच्या घनतेच्या क्लिनिकल फायद्यांची तपासणी अनेक सिस्टमिक आरोग्याच्या स्थितीत केली गेली आहे. एकाग्रतेमध्ये उपस्थित असलेल्या वेगवेगळ्या वाढीचे घटक पेशींच्या स्थलांतरात महत्वाची भूमिका बजावतात, पेशींना अधिक कार्यक्षमतेने कार्य करण्यास उत्तेजन देतात. रक्तपुरवठ्यास चालना देतात आणि ऊतकांची दुरूस्ती करतात. म्हणूनच हे घटक ऑक्सिजनची पातळी वाढविण्यास, ऊतींना झालेल्या जखमा अशा सर्व लक्षणांचे निराकरण करून निरोगी ऊतीच्या पुनरुत्पादनास मदत करतात, असं डॉ. महाजन म्हणाले.

पुढे ते म्हणतात, “अर्थात, वैयक्तिक लक्षणांवरही विचार करणे तितकेच महत्त्वाचे असून त्यानुसार उपचार देणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारची दीर्घकालीन लक्षणे कशी टाळता येतील या दृष्टीने प्रयत्न करणे अधिक गरजेचे आहे. पोस्ट-कोविड सिंड्रोम हा व्हायरसप्रमाणेच नवीन आहे, म्हणूनच त्यानुसार उपचार करणे अधिक गरजेचे आहे.

loading image