
झोपण्याआधी गाणी ऐकताय! सवय पडू शकते महागात
गाणं ऐकायला अनेकांना आवडतं. अनेकजण मूड फ्रेश करण्यासाठी गाणं ऐकून झोपतात. झोपेतही (Sleep) अनेकजण गाणी ऐकतात. तुम्हीही असे करत असाल तर आत्ताच सावध व्हा. कारण एका संशोधनानुसार, जे लोक झोपण्यापूर्वी गाणी (Music) ऐकतात त्यांच्या झोपेतपण गाणी वाजत राहतात. म्हणजेच झोपेत असताना, तुमच्या मेंदुमध्ये (Brain) संगीताची प्रक्रिया बंद नसून सुरूच असते. याविषयी संशोधन झाले असून त्याचे परिणाम 'सायकोलॉजिकल सायन्स' जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.
हेही वाचा: महिलांना लागते पुरुषांपेक्षा जास्त झोप! ही आहेत कारणे
संशोधन का केले?
झोपेवर संशोधन अमेरिकेतील बेलर विद्यापीठातील मानसशास्त्र आणि न्यूरोसायन्सचे सहयोगी प्राध्यापक मायकेल स्कलिन यांनी केले होते. संगीताचा झोपेवर काय परिणाम होतो हे शोधण्यासाठी त्यांनी संशोधन केले. ते याविषयी म्हणाले की, एके दिवशी रात्री अचानक त्यांना जाग आली. त्यानंतर त्यांना झोप आली नाही. पण त्यावेळी त्यांच्या मेंदूत झोपण्याआधी ऐकलेली संगीताची धून वाजत होती. असे एक दोन वेळा झाले. त्यानंतर त्यांनी या विषयावर संशोधन करण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा: रात्री वारंवार झोप मोड होतेय? तुमच्या चूकीच्या सवयी असू शकतात कारण

no Sleep
झोपेवर होऊ शकतो परिणाम
प्रोफेसर स्कलिन सांगतात. गी गाणी किंवा संगीत ऐकल्यावर आपल्याला शांत वाटते. तरूणाई नियमितपणे झोपताना गाणी ऐकते. पण झोपायचा प्रयत्न करत असताना मेंदूमध्ये संगीत वाजत राहतं. यामुळे झोपेवर परिणाम होऊन ती खराब होण्याची शक्यता असते.
हेही वाचा: दुपारी ऑफिसमध्ये येणारी झोप कशी टाळाल? जाणून घ्या सोप्या टिप्स

sleep
गाणं ऐकण्याची हवी योग्य वेळ
स्कलिन यांनी याबाबत संशोधन केले. त्यानुसार परीक्षण करून ते निष्कर्षाप्रत पोहोचले. त्यांनी ५० लोकांचा अभ्यास केला. त्यांना झोपण्याआधी वेगवेगळ्या प्रकारचे संगीत ऐकवले आणि त्यानुसार झोपेवर होणाऱ्या प्रभावाचा अभ्यास केला. जे लोकं झोपेआधी जास्त संगीत किंवा गाणी ऐकतात त्यांची झोप अधिक खराब होऊ शकते. स्कलिन सांगतात, संगीत ऐकण्याची वेळही महत्त्वाची असते, त्यामुळे झोपण्यापूर्वी संगीत ऐकू नका.
Web Title: Read About If You Listen Song Before Sleeping Whats The Effect On Your Body
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..