वजन कमी झाल्यानंतर परत वाढतंय? यामागे असू शकते 'हे' कारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

weight

वजन कमी झाल्यानंतर परत वाढतंय? यामागे असू शकते 'हे' कारण

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : वजन कमी (weight loss) करणे ही एक हळूवार प्रक्रिया असून यासाठी आहारावर नियंत्रण, व्यायाम आणि अधिक संयम गरजेचा आहे. कमी खाणे किंवा उपासमार करणे यासारखे शॉर्टकट (shortcut for weight loss) घेतल्याने कधीही वजन कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी कोणतेही जादूचे सूत्र नाही. न्यूट्रिशनिस्ट नमामि अग्रवाल यांनीही इन्स्टाग्रामवर आपल्या नवीन पोस्टमध्ये याचा पुनरुच्चार केला आहे, ती म्हणते की प्रतिबंधात्मक आहार ही वजन कमी करण्यासाठी कधीच चांगली कल्पना नसते. (reasons behind why double weight gain)

हेही वाचा: ऐन उन्हाळ्यात एसी आणि कूलरचा व्यवसाय लॉक; कोट्यवधींची उलाढाल ठप्प

अनेकजण वजन कमी करण्यासाठी कमी अन्न खातात, अनेकवेळा उपाशी राहतात. मात्र, ही चुकीची पद्धत आहे. तुम्ही ट्रेंडिंग डायट स्टाईल निवडता, वजन कमी करण्यासाठी प्रवृत्त होता. यानंतर गोंधळून जाउन ते सोडून देत असता. पुन्हा दुसरे डायट निवडून सेम प्रोसेस फॉलो करता. मात्र, हे सर्व करताना आपल्याला आपल्या बुद्धीचा वापर करणे देखील गरजेचे आहे. त्यामुळे तुमचे वजन हळूवार कमी होईल आणि मेंटेन राहील.

वजन कमी करण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही किंवा कोणतेही जादूचे पेय्य नाही. यासाठी चांगला व्यायाम आणि संतुलित आहार हेच एक तंत्र आहे. आपण एक ग्लास हिरव्या पालेभाज्यांचा रस पिऊ शकतो. मात्र, हा विशिष्ट रस शुद्ध आहार नसतो. काही वजन कमी करण्यासाठी कमी खाण्याचा सल्ला देतात. मात्र, तंदुरुस्त राहण्यासाठी शिस्तबद्ध नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. वजन कमी करण्यासाठी कुठल्याही गोष्टी तथ्य पडताळल्याशिवाय करू नका.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

loading image
go to top