लॉकडाऊनमध्ये अचानक तुमचं वजन का आणि कसं वाढलं ? हि आहेत कारणं

weight
weight
Updated on

पुणे : अनेक दिवसांपासून म्हणजेच कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरु आहे त्यात अनेकजण घरातच बसून आहे. त्यामुळे अनेकांची वजन वाढली आहे. एका सर्वेक्षणामध्ये वजन वाढण्याची चार मुख्य  कारणे समोर आलेली आहेत. लॉकडाऊनच्या या दिवसांत लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांच्याच जीवनशैलीमध्ये बदल झालेला आहे. लॉकडाऊनमध्ये अनेकांमध्ये वजन वाढण्याचे प्रमाण जास्त आहे. म्हणजेच लॉकडाऊनमध्ये वजन का आणि कसे काय वाढले याचे अभ्यास संशोधकांनी केलेला आहे.

यूकेतील स्लिमिंग वर्ल्ड या वेट लॉस ऑर्गनायझेशनने हेल्थ अँड वेलबिंग स्टडी अंतर्गत एक सर्वेक्षण केलं. यामध्ये अनेकांना  आरोग्य, मूड, आहार, मद्यपान, शारीरिक कार्य आणि वजन व्यवस्थापनाबाबत विचारणा करण्यात आली होती. 9 एप्रिल ते 16 मे या दिवसांमध्ये झालेल्या या सर्वेक्षणात स्लिमिंग वर्ल्डच्या 222 सदस्य आणि 637 इतर नागरिक असे एकूण 800 प्रौढ व्यक्तींचा या सर्वेक्षणात सहभाग होता. 1 ते 4 सप्टेंबर आयोजित युरोपियन अँड इंटरनॅशनल काँग्रेस ऑन ऑबेसिटीमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले.

इतर सर्वसामान्य नागरिकांपेक्षा स्लिमिंग क्लबमार्फत वजन व्यवस्थापनासाठी मदत घेणाऱ्यांचं वजन मात्र या कालावधीत कमी झालं आहे. त्यांनी भरपूर व्यायाम केला आणि त्यांचं इतर आरोग्यही नीट होतं, असं या सर्वेक्षणात दिसून आलं आहे. लॉकडाऊनमध्ये ज्या लोकाचं वजन वाढलं आहे त्या लोकांना ते वजन नियंत्रणात ठेवणं कठीण वाटलं आहे. याची चार मुख्य कारणं या सर्वेक्षणातून समोर आली.

एक म्हणजे अनेकांना दुकानामध्ये जाऊन हेल्दी फूड खरेदी करून आणणे अशक्य होतं, दुसरं म्हणजे घरात बसून बसून कंटाळवाणं वाटणं आणि अनेक दिवसांपासून घरी राहिल्याने सतत काही ना काही खात राहणं, तिसरं म्हणजे भरपूर स्ट्रेस आणि एन्झायटी यामुळे आरामात खाणं आणि चौथं म्हणजे जास्तीत जास्त बसून राहणे आणि लॉकडाऊनमध्ये जास्त खाऊन कमी व्यायाम केलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com