esakal | इनर इंजिनिअरिंग : अमर्याद लोभी बना
sakal

बोलून बातमी शोधा

Sadguru
इनर इंजिनिअरिंग : अमर्याद लोभी बना

इनर इंजिनिअरिंग : अमर्याद लोभी बना

sakal_logo
By
सद्‌गुरू, ईशा फाउंडेशन

तुम्ही शुद्ध जीवन जगलात, तर ते अतिशय सुंदर आहे. तुम्ही एक असे जीवन बनलात, जे तीव्र आहे पण काही विशिष्ट गोष्टींच्या आधीन झाले असेल, तर तुम्ही अशा स्थितीत जगाल जिथे चांगल्या गोष्टी घडल्या तर तुम्ही खूष व्हाल, आणि वाईट गोष्टी घडल्या तर रडत बसाल. हा तुमच्या सभोवतालच्या परिस्थितीच्या गुलामगिरीत जगण्याचा लाचार मार्ग आहे. जीवनाचे स्वरूपच असे आहे, की कोणतीही व्यक्ती त्यांच्या सभोवतालच्या परिस्थिती त्यांच्या इच्छेनुसार १०० टक्के नियंत्रणात ठेवू शकत नाहीत. म्हणून, तुम्ही या गुलामगिरीच्या स्थितीत राहिल्यास साहजिकच तुम्हाला थोडीशी आनंदाची भरती आणि थोडीशी दुःखाची ओहोटी ही ठरलेलीच असेल. तुम्ही आयुष्यात कसे प्रस्थापित आहात आणि तुमचे जीवन कसे आहे यावर हे अवलंबून आहे.

एकदा आयुष्य अशा स्थितीत आलं, की मग स्वाभाविकपणे तुम्हाला दुःखाची भीती वाटते. दुखः दररोज नसले, तरी तुम्ही सतत ‘काय होईल?’ या भीतीत वावरत असता. तुम्ही भीतीच्या छायेत जगता, तेव्हा तुम्ही आनंदी असल्याचा दावा करू शकता का? काही क्षण असे असू शकतील, जेव्हा तुम्हाला भीतीचा विसर पडेल, पण जोपर्यंत ती आहे, तोपर्यंत आनंद असूच शकत नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यात उचलत असलेलं प्रत्येक पाऊल हे केवळ अर्धवट पाऊल असणार. कोणत्याही बाबतीत ते कधीही पूर्ण पाऊल असू शकत नाही.

हे पहा, लोक कोणतीही गोष्ट संपूर्ण स्वच्छंदी होऊन करू शकत नाहीत. ते स्वच्छंदपणे गाऊ शकत नाहीत, ते स्वच्छंदी होऊन नाचू शकत नाहीत, ते स्वच्छंदपणे काम करू शकत नाहीत, ते स्वच्छंदी होऊन लांब पळू शकत नाहीत. त्यांच्यात मुक्ततेची किंवा स्वच्छंदपणाची भावनाच नसते कारण प्रत्येक गोष्टीत भीतीचेच अधिराज्य असते. यालाच तुम्ही समाधान असे म्हणता. लोकं समाधानाच्या शोधात असण्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांना जीवनाची भीती वाटते.

असे समाधान हे एक प्रकारे जीवन सीमित करण्याचाच प्रयत्न आहे. एखाद्या व्यक्तीला तिचे आयुष्य सीमित का करावेसे वाटत असेल? लोक समाधानीपणाचे तत्त्वज्ञान शिकवत चाललेत कारण त्यांना आयुष्याची भीती वाटत असते. त्यांना वाटतं की तुम्ही आयुष्य जरा जास्तच जगाल. परंतु आयुष्य जास्त जगणं असं नाहीच, तुम्ही ते कितीही जगलात तरी ते कमीच आहे. तुम्ही जास्त जगू किंवा मरू शकता का? तुम्ही फक्त जगू किंवा मरू शकता. तुम्ही संकुचित, सीमित आयुष्य जगलं असेल तर खरं पाहता तुम्ही जगलाच नाहीत असा त्याचा अर्थ होतो, तुम्ही तुमचं आयुष्य सीमित केलं. तर मग याचा अर्थ असा आहे का की मी अत्यंत बेलगामपणे लोभी आयुष्य जगावे? नाही, तो मुद्दाच नाही.

तुमच्या मनात लोभ आणि समाधानपणाची कल्पना उद्भवण्याचे कारण म्हणजे तुम्हाला जीवनाचा तीव्र असा अनुभवच नाही. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात लोभ ही एक शक्यता बनण्याचे एकमेव कारण म्हणजे काही केल्या, ते जे काही करताहेत त्यांचा तो जीवनानुभव पुरेसा नाही. वस्तू जमा करून ठेवल्याने त्यांचे आयुष्य परिपूर्ण होईल असे त्यांना वाटते. तुम्ही ज्याला लोभ असे म्हणता तो जीवन अधिक प्रमाणात जगण्यासाठीची धडपड आहे.

लोभीपणात तुम्ही कंजुषी दाखवता तेव्हा तुम्ही खरोखर फक्त लोभी बनता. तुम्ही पूर्णतः लोभी बनलात, तर तुम्ही आध्यात्मिक बनता कारण ज्याला तुम्ही आध्यात्मिकता असे म्हणता ते म्हणजे तुम्ही कशानेही समाधानी होण्यास तयार नसता. तुम्ही सृष्टीच्या एका लहानशा तुकड्यावर समाधानी होण्यास तयार नसता. तुम्ही अमर्याद विस्ताराच्या शोधात असता आणि तीच आध्यात्मिकता आहे. तुम्ही अनंताच्या शोधात आहात, तेच अध्यात्म आहे. आणि तोच लोभ आहे, नाही का? अमर्याद लोभ.

loading image
go to top