esakal | इनर इंजिनिअरिंग : झेन आणि योग
sakal

बोलून बातमी शोधा

Sadguru

इनर इंजिनिअरिंग : झेन आणि योग

sakal_logo
By
सद्‌गुरू, ईशा फाउंडेशन

‘झेन’ हा शब्द ‘ध्यान’ या संस्कृत शब्दापासून आला आहे. गौतम बुद्धांनी ध्यान शिकवले. बोधीधर्म तेच ध्यान चीनमध्ये घेऊन गेले, तिकडे ते ‘चॅन’ बनले. हे चॅन फार पूर्वेकडील आशियायी देशांपर्यंत पोहोचले आणि तिकडे ते झेन बनले. हे योगापेक्षा फार वेगळे नाही. ज्याला आपण योग म्हणतो त्यालाच ते झेन म्हणतात.

‘योग’ आपण एक विज्ञान म्हणून प्रस्तुत करतो आणि तीच गोष्ट झेनमध्ये एक कला म्हणून अभ्यासली जाते. आणि कलेची कदर करण्यासाठी तुम्ही एका विशिष्ट प्रकारे परिपक्व होणे गरजेचे आहे. पण, विज्ञानाची फळे सर्वजण चाखू शकतात. झेन लोकप्रिय झाले कारण, एका निश्चित काळासाठी, अंदाजे चार ते पाच शतके अतिशय अलौकिक गुरू प्रगटले ज्यांमुळे झेनभोवती एक विलक्षण वलय आणि दर्जा निर्माण झाला. झेन परंपरेत हुएटी नावाची एक व्यक्ती होती. प्रत्येकजण त्यांना झेन गुरू म्हणून त्यांचा आदर करायचे, पण लोकांना देण्याजोगी त्यांच्याजवळ कुठलीही शिकवण नव्हती. ते ज्या शहरात किंवा गावात जायचे, तिथे एक मोठे पोते घेऊन जायचे, मुले त्यांच्याभोवती जमा होत आणि ते त्यांना गोड खाऊ देऊन निघून जात असत. बस एवढेच ते करायचे! लोक त्यांच्याजवळ यायचे आणि शिकवण मागायचे. ते फक्त हसायचे आणि निघून जायचे. एक दिवस, आणखीन एक झेन गुरू, नबानीन यांना हुएटी खरेच झेन गुरू आहेत का हे जाणून घ्यायचे होते. म्हणून त्यांनी हुएटींना विचारले, ‘झेन म्हणजे काय?’ ताबडतोब हुएटींनी पोते खाली ठेवले आणि उभे राहिले. नंतर त्यांनी विचारले, ‘झेनचा उद्देश काय आहे.’ हुएटींनी पोते खांद्यावर घेतले आणि निघून गेले. योग सुद्धा हेच आहे आणि प्रत्येक आध्यात्मिक साधना सुद्धा हेच आहे.

तुम्हाला योग किंवा झेन किंवा ज्या काही नावाने तुम्ही त्याला संबोधता, ते साध्य करायचे असल्यास तुमचे ओझे टाकून द्यावे लागेल, तुमच्या मार्गात जे काही अडथळा निर्माण करत आहे ते सगळे काही सोडून द्यावे लागेल, तुम्हाला मोकळे राहावे लागेल आणि सरळ उभे राहावे लागेल. हे महत्त्वाचे आहे. जोपर्यंत तुम्ही ओझे घेऊन चालत आहात, तोपर्यंत तुम्ही ते कदाचित कधीच साध्य करू शकणार नाही. कोणी एखादा ते ओझे घेऊन सुद्धा ते साध्य करू शकतात, पण अशी व्यक्ती विरळाच. किती लाखात अशी व्यक्ती एखादी व्यक्ती असेल मला माहीत नाही.

आता योगाचे उद्दिष्ट काय? सर्व ओझे पुन्हा घ्या! पण आता ते काही ओझे नाही, ते ओझ्यासारखे वाटत नाही कारण आता तुम्ही जाणता, जरी हा सगळा पसारा असला तरी ते काही खरे नाहीये. असो, तुम्ही जगलात किंवा मरण पावलात याने काही फरक पडत नाही. उद्या सकाळी आपण सगळे या ग्रहावरून गायब झालो, तर याने खरेच काही फरक पडणार नाही. काही मूर्ख रडतील, अजून काही मूर्ख आरडाओरडा करतील आणि पुन्हा एकदा ते सुद्धा मरण पावतील, आणि पुन्हा एकदा ते जन्म घेतील. हो, कदाचित तुम्ही मरण पावलात निदान ते याबद्दल विचार करायला लागतील, ‘हे जीवन आहे तरी काय?’ तुम्ही कायमचेच जीवित राहिलात, तर कदाचित ते कधीच याबद्दल विचार करणार नाहीत. पुष्कळ लोक त्यांच्या सुखोपभोगात इतके रमले आहेत, की आता त्यांना असे वाटू लागले आहे की ते अमर आहेत. हा निव्वळ मूर्खपणा आहे.

loading image