इनर इंजिनिअरिंग : विरक्‍तीचे तत्त्वज्ञान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इनर इंजिनिअरिंग : विरक्‍तीचे तत्त्वज्ञान

आजकाल ‘विरक्ती’बद्दल खूप बोलणे चालू आहे, कारण मुळात जीवनासोबत सहभागाविषयी भीती आहे. वास्तविक, भीती ही सहभागाविषयी नाही, तर गुंतण्याविषयी आहे.

इनर इंजिनिअरिंग : विरक्‍तीचे तत्त्वज्ञान

आजकाल ‘विरक्ती’बद्दल खूप बोलणे चालू आहे, कारण मुळात जीवनासोबत सहभागाविषयी भीती आहे. वास्तविक, भीती ही सहभागाविषयी नाही, तर गुंतण्याविषयी आहे. लोकांना सहभाग आणि गुंतून जाणे यातला फरक माहीत नसल्यामुळे ते विरक्त होण्याबद्दल बोलतात. तुम्हाला गुंतून न जाता फक्त सहभागी कसे व्हायचे, हे माहीत असल्यास तुम्ही विरक्त होण्याबद्दल बोलत नसता. ही गुंतण्याची भीती आहे, ज्याने विरक्तीविषयीचे हे सर्व तत्त्वज्ञान चालू केले आहे.

तुम्ही गुंतून पडता ते जीवनासोबत काहीतरी चुकीचे आहे म्हणून नाही. तुम्ही गुंतून पडता ते तुम्ही जीवन योग्यरीत्या हाताळत नसल्यामुळे. जीवनात सहभाग नसल्यास तुम्हाला जीवन कळले नसते. याचा अर्थ, जेव्हा तुम्ही विरक्तीविषयी बोलता, तेव्हा तुम्ही जीवन टाळण्याविषयी बोलत आहात. तुम्हाला जिवंत राहून जीवन का टाळायचे आहे?

तुमचे जीवन शक्य तितक्या उत्साहाने घडले पाहिजे, पण गुंतण्याची भीती तुम्हाला सर्व प्रकारचे तत्त्वज्ञान निर्माण करायला भाग पाडते. अडचण ही आहे, की तुम्हाला ठराविक व्यक्ती सोबतच सहभागी व्हायचे निवडता आणि आजूबाजूचे जीवन टाळता, म्हणून तुम्ही गुंतून जाता. तुम्ही सध्या संपर्कात आहात त्या प्रत्येक गोष्टीबरोबर सहभागी झालात, तुम्ही श्वास घेत असलेली हवा, तुमच्या आजूबाजूचे वातावरण, तुमच्या आजूबाजूचे जीवन, तर गुंतण्याचा प्रश्नच येत नाही. निवडक सहभागामुळे गुंतणे होते. तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीशी सहभाग दाखवला, तर त्या क्षणी तुम्हाला जीवन उमजेल.

आध्यात्मिक असण्याचा खरा अर्थ हा आहे की तुमचा जीवनाविषयीचा रस इतका सखोल झाला आहे, की तुम्हाला जीवनाविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची आहे. तुम्हाला फक्त भौतिक आयाम नाही, तर संपूर्ण जीवन जाणून घ्यायचे आहे. जो व्यक्ती जीवन टाळण्याचा प्रयत्न करत आहे, तो आध्यात्मिक असण्याची काहीच शक्यता नाही; कारण अध्यात्मासाठी सगळ्याविषयी संपूर्ण सहभाग गरजेचा आहे. अन्यथा, काहीच शक्यता नाही.

जीवनप्रक्रियेने नाही, तर ज्या अज्ञानाने तुम्ही जीवन हाताळत असल्यामुळे तुम्ही गुंतत जाता. तुम्ही तुमची ओळख तुम्ही नसलेल्या गोष्टींशी बांधून ठेवता, म्हणून तुम्ही गुंतून जाता. ज्या गोष्टी तुम्ही नाही आहात, अशा लाखो गोष्टींशी तुम्ही स्वतःची ओळख बांधून घेतली आहे. सुरुवात तुमच्या शरीरापासून होते, मग तुमचे विचार, मते, कल्पना आणि भावना, तुमचे कपडे, दागिने, कुटुंब आणि काम. एकदा तुम्ही तुमची ओळख बांधली, की मग तुमचे संपूर्ण जीवन विस्कळित होऊन जाते. तुमच्याकडे तुम्ही काय आहात याची योग्य दृष्टी नसल्यास तुम्ही गुंतून जाता. तुम्हाला गुंतायचे नसल्यास तुम्ही काय आहात आणि काय नाही आहात, या विषयी जागरूकता ठेवली पाहिजे. हे अंतर सतत ठेवल्यास गुंतण्याचा प्रश्नच येत नाही.

Web Title: Sadguru Writes Philosophy Of Apathy

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top