इनर इंजिनिअरिंग : दैवी पर्याय : चाकरी करणे किंवा राज्य करणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sadguru

बहुतेक लोकांसाठी, त्यांना जे हवे आहे ते निर्माण करणे म्हणजे साधारणपणे कल्पना करणे, स्वप्न पाहणे, लालसा, तळमळ, प्रार्थना करणे आणि भीक मागणे आहे.

इनर इंजिनिअरिंग : दैवी पर्याय : चाकरी करणे किंवा राज्य करणे

बहुतेक लोकांसाठी, त्यांना जे हवे आहे ते निर्माण करणे म्हणजे साधारणपणे कल्पना करणे, स्वप्न पाहणे, लालसा, तळमळ, प्रार्थना करणे आणि भीक मागणे आहे. पण काहीही न मागता, कशाचाही विचार न करता, निर्मिती करण्याचा आणखी एक मार्ग आहे, जिथे गोष्टी सहज घडतात. आपण तिथे पोहोचण्याआधी, थोडीशी पेटून उठून केलेली कृती आवश्यक आहे. ज्या लोकांना कधीही पेटण्याचा अनुभव माहीत नाही, त्यांना पाण्याचा थंडावा कळणार नाही. जे लोक आपले आयुष्य निरुत्साहाने, थंडपणे जगतात, त्यांना दुसरा मार्ग कधीच कळू शकत नाहीत. निदान काही काळासाठी तीव्रपणे सक्रिय होणे तुमच्या ऊर्जांना धगधगत्या पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्यात गती आणण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. मग, त्यांना दुसर्‍या कशात रूपांतरित करणे खूप सोपे आहे. कर्माचा किंवा कृतीचा संपूर्ण हेतू हाच आहे.

साधक याच कारणासाठी कृती निवडतो. असंही आपण काहीतरी कृती करणारच आहोत. पण आपल्याला हिटलरची कृती करायची आहे की महात्मा गांधी यांची कृती करायची आहे? तुम्हाला जगावर राज्य करायचे आहे की जगाची चाकरी करायची आहे? शेवटी हीच निवड आपल्याला करायची आहे. साधारणपणे प्रत्येकाला जगावर राज्य करायचे असते. त्यांचे प्रयत्न अर्धवट असल्यामुळे ते यशस्वी होत नाहीत. त्यामुळे ते फक्त त्यांच्या कुटुंबावर आणि मुलांवर राज्य करू शकतात. पण त्यांना खरेतर जगावर राज्य करायचे असते. मूर्ख माणसामध्ये ते करण्याची क्षमता किंवा तीव्रता नसते. अन्यथा, तो संभाव्य हिटलर होईल.

निवड फक्त एवढीच आहे - एकतर राज्य करणे किंवा चाकरी करणे. जो पर्याय तुम्हाला सर्वात सुसंगत, देवत्वाच्या सर्वात जवळचा आणि अनुभूतीच्या सर्वात जवळचा वाटतो, त्या प्रकारची कृती निवडा. प्रत्येक क्षणी, एका क्षणाचाही खंड न करता, प्रचंड तीव्रतेने ती कृती करा. मग एक दिवस असा येईल, जेव्हा यापुढे कृती करण्याची गरज उरणार नाही. ज्याला जोरदार कृतीत कसं झोकून द्यायचं ते माहीत नसेल, त्याला निश्चल असणे म्हणजे काय हे कधीच कळणार नाही. जर तुम्ही निश्चल होण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही फक्त सुस्त व्हाल. जर तुम्हाला जोरदार, तीव्रतेने कृती करणे माहीत असेल तरच तुम्हाला निश्चलता कळू शकते.

जे लोक त्यांच्या आयुष्यात नेहमीच आराम करत असतात ते विश्रांतीबद्दलचे तज्ञ असायला हवेत, पण ते सत्य नाही. जो तीव्रतेने काम करतो त्यालाच विश्रांती म्हणजे काय हे कळू शकते.

Web Title: Sadguru Writes Serve Or Rule

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Sadguruhealth