esakal | डोक्यात लाल फोड येतात? नका करू दुर्लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

scalp

डोक्यात लाल फोड येतात? नका करू दुर्लक्ष

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

कधी कधी डोक्याच्या केसांच्या मूळाच्या खाली छोटे-छोटे लाल रंगाचे फोड येतात. याला स्कॅल्प फाॅलिकुलिटिस म्हणजे एक प्रकारचा इन्फ्लेमेटरी डिसऑर्डर आहे. ते हेअर फाॅलिकल्सला प्रभावित करते. त्याने तुमच्या डोक्यात छोटे-छोटे खाज सुटणारे फोड येतात. खाज आणि ठणक या कारणाने खूप त्रास होतो. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास फोडांचा आकार वाढतो. ती फुटल्यास जखम होऊन जास्त त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्याच्यावर वेळीच उपचार करा.

स्कॅल्प फाॅलिकुलिटिसचे कारण

- खूप अधिक वेळेपर्यंत हेल्मेट घालणे

- डोक्याचे सगळे केस काढून टाकणे.

-केस खूप अधिक खट्ट बांधणे

- डोक खाजवत राहणे

- अतिरेकपणे हेअऱ प्रोडक्ट्सचा वापर करत राहणे. याने हेअर फाॅलिकल्सला बंदही करु शकते.

स्कॅल्प फाॅलिकुलिटिसचे लक्षणे

- छोटे-छोटे लाल रंगाचे फोड येणे

- काही फोड पांढरे होतात.

-जळजळ होऊन जखम होणे

- त्रास होणे.

- खाज येणे

स्कॅल्प फाॅलिकुलिटिसचे प्रकार

- बॅक्टेरियल फाॅलिकुलिटिस - सर्वसाधारण बॅक्टेरियल इन्फेक्शन

- स्युडोफोलिकुलिटिस बरबे - इनग्रोन हेअरमुळे होते.

- स्युडोमोनास फाॅलिकुलिटिस - कमी स्वच्छतेचे पूल्स आणि हाॅट टब हे कारण

- पिटिरोसपोरम फाॅलिकुलिटिस - त्वचेवर लालसरपणा आणि खाज होते.

डीप फाॅलिकुलिटिसही चार प्रकारचे असते,

- फोडे - एक बॅक्टेरियल इन्फेक्शन ज्यात त्रासदायक फोड येतात.

- सायकोसिस बरबे - हे खूप रेजर बम्पच्या समान असते.

- ईसिनोफिलिक फाॅलिकुलिटिस - अनेकदा होणारे इन्फेक्शन

- ग्राम - निगेटिव्ह फाॅलिकुलिटिस - दीर्घकाळ अँटिबायोटिक औषधे घेतल्याने हे होते.

स्कॅल्प फाॅलिकुलिटिसवर कसा उपचार करावा?

- बाधित अंग हे अँटीबॅक्टेरियल क्लिनरने स्वच्छ करु शकता. जर तुम्ही अँटीबायोटिक्स बाधित भागावर लावल्यास खाज कमी होईल. फ्युसिडिक अॅसिड जेल, क्लायंडोमिसिन आदी प्रभावशाली ठरु शकतात.

स्टेराॅइड लोशन, क्रीम व साबण

- जर तुमचे इन्फेक्शन खूपच कमी असेल तर डाॅक्टर तुम्हाला काही स्टेराॅईड लोशन, क्रीम आणि साबणचा वापर करण्यास सांगतील. डोक्यातील फाॅलिकुलिटिसला बरे करण्यासाठी डाॅक्टर तुम्हाला शाॅम्पूही देऊ शकतात. जेव्हा तुम्ही एखादा शाॅम्पू घ्यायला जाता, तेव्हा नेहमी अँटी डँड्रफ निवडा. ज्यात टी ट्री ऑईल आणि सिक्लोपिरोक्स आदींचा समावेश असतो.

तोंडावाटे घ्यायची औषधी

- जर तुमचे इन्फेक्शन गंभीर असेल तर अशा वेळी डाॅक्टर तुम्हाला तोंडावाटे घ्यायची औषधी सांगू शकतात.

घरगुती उपाय

- घरगुती उपायांचा वापर करण्यापूर्वी तुम्ही दाढी आणि हेल्मेट घालण्याच्या सवयींकडे काळजीपूर्वक पाहा. तुम्ही खालील काही घरगुती उपायांचा वापर करु शकता

१- वार्म कम्प्रेस

- एखादे कापड थोड्या गरम पाण्यात भिजवा आणि बाधित भागावर काही वेळ ठेवा. ही कृती दिवसभरातून अनेकदा करा. याने तुम्हाला आराम मिळेल.

२.- हर्ब्स - सूज कमी करण्यासाठी तुमच्या डोक्यात ओटमील लावा. एका अभ्यासानुसार ओटमीलमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात. जे तुम्हाला त्वचेच्या त्रासापासून वाचवेल.

३. तेल -

काही तेल जसे की लवंग, युक्लेप्टस, टी ट्री आणि दालचिनी आदी तेल तुम्हाला या स्थितीत खूप आराम देऊ शकेल. हे तेल बाधित भागावर अवश्य लावा.

loading image