ज्येष्ठांनो, हिवाळ्यात उत्तम आरोग्यासाठी ठेवा 'असा' आहार-विहार!

ज्येष्ठांनो, हिवाळ्यात उत्तम आरोग्यासाठी राहू द्या 'असा' आहार-विहार!
ज्येष्ठांनो, हिवाळ्यात उत्तम आरोग्यासाठी राहू द्या 'असा' आहार-विहार!
ज्येष्ठांनो, हिवाळ्यात उत्तम आरोग्यासाठी राहू द्या 'असा' आहार-विहार!Sakal
Summary

हिवाळ्यासाठी ज्येष्ठांनी गरम पाण्याच्या अभ्यंग स्नानासह हाडदुखीत उपयोगी असलेल्या मेथीच्या लाडूच्या आहारासह पुरेशा व्यायामाची दिनचर्या अमलात आणणे गरजेचे आहे.

सोलापूर : हिवाळ्यासाठी (Winter) ज्येष्ठांनी गरम पाण्याच्या अभ्यंग स्नानासह हाडदुखीत उपयोगी असलेल्या मेथीच्या लाडूच्या आहारासह पुरेशा व्यायामाची दिनचर्या अमलात आणणे गरजेचे आहे. त्यातून त्यांना उत्तम आरोग्यप्राप्ती मिळण्यास मोठी मदत होणार आहे. उत्साहवर्धक, भूक वाढलेला, तसेच वात, पित्त व कफ हे स्थिर ठेवणारा हेमंत ऋतू आहे. शरीराला ऊर्जा देण्यासाठी व पुढील वर्षभराची शरीर सक्षमीकरणाची गुंतवणूक करावी लागणार आहे. यामध्ये सकाळी किमान अर्धा तास किंवा त्यापेक्षा अधिक चालणे, योगासने यांचा समावेश असावा. त्यानंतर हलका घरगुती पदार्थांचा नाश्‍ता असावा.

ज्येष्ठांनो, हिवाळ्यात उत्तम आरोग्यासाठी राहू द्या 'असा' आहार-विहार!
Type-2 डायबेट्‌सपासून वाचवतील 'हे' सात आश्‍चर्यकारक उपाय! फॉलो करा

च्यवनप्राशचा उपयोग या ऋतूमध्ये केला जावा. विकतचे च्यवनप्राश महागडे असेल तर घरीच हे चव्यनप्राश तयार करता येते. याशिवाय डिंक लाडूप्रमाणे मेथी लाडू अधिक उपयोगी आहेत. आहारात मेथीचा लाडू, पराठे व कच्ची भाजी वापरली तर ते हाडे किंवा सांधेदुखीसाठी उपयोगी ठरते. सकाळी व रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी एकदम न पिता एकेक घोट घेत सावकाश प्यावे. तसेच दुपारी झोपू नये. सायंकाळचे जेवण शक्‍यतोवर सूर्यास्ताच्यापूर्वी किंवा सात वाजेपर्यंत घ्यावे.

अभ्यंग व उटण्याचा उपयोग

शरीराला अभ्यंगस्नानाची जोड देणे आवश्‍यक आहे. केवळ दिवाळीपुरते अभ्यंग न करता हिवाळ्यात दररोज घरातील सदस्यांच्या मदतीने ज्येष्ठांना अभ्यंगस्नान उपयुक्त ठरते. पुरेसे शरीराचे रक्ताभिसरण वाढविणारे गरम पाणी वापरावे. तसेच उटण्याचा वापर त्यामध्ये करावा. तेलाने शरीराचे मर्दन (माशिल) करावे. अंगाला तेल चोळावे. यामध्ये मोहरी, तिळाच्या किंवा सुगंधी तेलाचा उपयोग करता येणार आहे. घरच्या घरी बनवलेले उटणे वापरता येतील. मसुरीची डाळ, आंबे हळद पावडर, अनंत मूल पावडर, त्रिफळा पावडर, चंदन पावडर, मुलतानी माती आदींचे मिश्रण करून घरगुती उटणे स्नानासाठी वापरता येईल.

अशी असावी दिनचर्या

  • पहाटे पाच वाजता झोपेतून उठावे

  • साडेपाच वाजता फिरायला जाणे व व्यायाम

  • मेथी लाडू किंवा डिंक लाडू व च्यवनप्राश घ्यावे

  • सात वाजता पुरेसे ऊन असताना तेलाची मालिश व गरम पाण्याने अभ्यंग

  • आठ वाजता हलका घरगुती पदार्थाचा नाश्‍ता

  • दुपारी अकरानंतर जेवण (जेवणात फुलके, भाकरी, भाजी, कोशिंबीर, कच्च्या भाज्यांचा समावेश असावा)

  • सायंकाळी फेरफटका व शक्‍यतो सूर्यास्तापूर्वी भोजन (भोजनात मुगाची खिचडी व गरम साधे पदार्थ असावेत)

ज्येष्ठांनो, हिवाळ्यात उत्तम आरोग्यासाठी राहू द्या 'असा' आहार-विहार!
Health Tips - भाऊ, व्यायाम शास्त्र समजून घ्या

काय खाऊ नये...

केळी, पेरू, दही, शेंगदाणा, अतितिखट पदार्थ, मिरची, बाहेरचं जंक फूड, चायनीज आदी कोणतेही पदार्थ खाण्यात नसावेत.

ज्येष्ठ नागरिकांना वर्षभर चांगली ऊर्जा अभ्यंगस्नान, मेथीचे लाडू व सकस आहारातून देण्याचे काम हेमंत ऋतूमध्ये करता येते. अनेकांना कोविड होऊन गेला आहे किंवा अनेक महिने घरात बसल्याने पुरेसा व्यायाम झालेला नाही. त्यांना पुरेशा व्यायामाने व आहाराने दिलासा दिला जाऊ शकतो.

- डॉ. मुकुंद मोरे, आयुर्वेद तज्ज्ञ, होटगी रोड, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com