esakal | हेल्दी फूड : वेगनिझम : ट्रेंड की लाईफस्टाईल?
sakal

बोलून बातमी शोधा

Healthy Food

हेल्दी फूड : वेगनिझम : ट्रेंड की लाईफस्टाईल?

sakal_logo
By
शौमा मेनन

नमस्कार, कोरोना काळात आपण सर्वजण सुरक्षित राहात असालच. या वर्षी (२०२१) मार्केटिंगमध्ये सर्वाधिक वापरलेला शब्द आहे ‘वेगन’. हे नक्की काय आहे, कशामुळे व कसे हे पाहण्यासाठी थोडी अधिक माहिती घेऊयात.

वेगनिझम म्हणजे काय?

वनस्पतीजन्य उत्पादनांच्या वापराशिवायची जीनवशैली म्हणजे वेगनिझम. अन्नघटकांचा विचार करायचा झाल्यास, कोणतीही डेअरी उत्पादने, मांस, मध, यिस्ट यापैकी कशाचाही वापर आहारात न करणे.

वेगन कशासाठी?

खरेतर याचे उत्तर खूप विस्ताराने द्यावे लागेल. मात्र, याचे मुख्य कारण लोकांचे प्राण्यांविषयी असलेले प्रेम हेच असून, त्याचबरोबर पित्त, मधुमेह व जीवनशैलीसंबंधित इतर आजारांपासून दूर राहणे, हेही आहे.

वेगनिझम कोणी पाळावा?

  • ज्यांना त्यांच्या सध्या अंगिकारलेल्या जीवनशैलीमध्ये फारसं बदल न करता हे डाएट स्वीकारता येईल.

  • आरोग्याविषयीची अशी कोणतीही मोठी तक्रार, जी वेगनिझम स्वीकारल्यास बरी होईल, असा सल्ला ज्यांना दिला जातो.

  • तुमची अशी खात्री असेल, की तुम्ही वेगनिझम स्वीकारल्यास पर्यावरणासाठी उपयुक्त ठरेल व इतर जिवांना कमीत कमी त्रास होईल. (हे मलाही मान्य आहे.)

वेगनिझमबद्दलचे प्रश्न

  • हे आरोग्यासाठी योग्य आहे का?

  • वेगन उत्पादने आरोग्यपूर्ण असतात का?

  • माझे वेगनिझमबद्दलचे मत काय आहे?

खरेतर, सर्व पीठे, साखर, तांदूळ, गहू हे सर्व वेगन उत्पादने आहेत. मात्र, बाजारात मिळणाऱ्या ‘वेगन बार’मध्ये यातील बहुतांश सर्वच पदार्थ असतात, मात्र ते तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही.

माझे वेगनिझमसंदर्भातील मत अगदी सोपे आहे. तुम्ही आरोग्यास घातक सर्व पदार्थ टाळून ही जीवनशैली स्वीकारू शकत असल्यास हे डाएट स्वीकारा. अर्थात, तुमच्या डाएटमधून अन्नघटकांचा कोणताही एखाद गट तुम्ही बाहेर काढल्यास तो तुम्हाला गोळ्या आणि टॉनिकमधून भरून काढणे अपरिहार्य असते. तुम्ही कसे करणे औषधनिर्मिती व्यवसायाच्या फायद्याचे असले, तरी तुमच्या तब्येतीसाठी नक्कीच नसते!

loading image