esakal | हेल्दी फूड : आरोग्य आणि प्रेरणा
sakal

बोलून बातमी शोधा

Tree

हेल्दी फूड : आरोग्य आणि प्रेरणा

sakal_logo
By
शौमा मेनन

प्रेरणा तुमच्या वाढीतील आणि यशामधील महत्त्वाचा भाग ठरते. तीच तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यामागचे महत्त्वाचे कारण ठरू शकते.

शारीरिक आरोग्य

आजच्या परिस्थितीत आपण सर्वजण घरामध्ये अडकून पडलो आहोत, इच्छा असूनही कोठे बाहेर जाणे शक्य नाही, कोणालाही भेटता येणे शक्य नाही आणि काही वेगळे करायची इच्छा असूनही शक्य होत नाही. अशा काळात स्वयंप्रेरणा मिळवणे खूप अवघड असते आणि घराच्या चार भिंतींच्या आत हालचालींवरही मर्यादा येतात. या काळात तुम्ही तुमची ऊर्जेची पातळी उच्च राहावी, तसेच शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहावे म्हणून काय करीत आहात? मी तुम्हाला यासाठी काही टिप्स देते, ज्या तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील.

  • डंबेल्सची एक जोडी खरेदी करण्यासाठी थोडे पैसे मोजा. आपल्यापैकी बहुतेकांना बॉडी वेट ट्रेनिंग हा व्यायामप्रकार अधिक भावतो, तेव्हा तो सुरू करा. दररोज स्वतःला नवे आव्हान द्या व ते पूर्ण करण्याचा आनंद लुटा.

  • तुमची रोजची व्यायामाची वेळ ठरवून घ्या आणि त्यात सातत्य राखा.

  • तुमच्या रोजच्या व्यायामाच्या वेळापत्रकात खूप आवश्यक असल्याशिवाय कोणताही बदल करू नका.

  • व्यायाम करताना आरशामध्ये स्वतःला न्याहाळा. तुमची प्रगतीच तुमची प्रेरणा बनेल.

  • व्यायाम करताना तुमच्या आवडीचे संगीत किंवा प्रेरणादायी ई-बुक ऐका. अशा प्रकारे तुम्ही व्यायामाकडे रोजचे काम म्हणून नव्हे, तर रोजची आनंदाची गोष्ट म्हणून पाहू लागाल.

  • तुमच्या वर्कआउटचे वेळापत्रक डायरीत लिहून ठेवा. तुम्ही उद्या काय करणार आहात, हे आदल्या दिवशीच पाहून ठेवा. उद्या काय करायचे आहे, हे माहितीच नाही अशी परिस्थिती ठेवू नका. तुम्ही दिवसभराचे नियोजन करता, त्याचप्रमाणे व्यायामाचेही नियोजन करा.

मानसिक आरोग्य

  • तुम्ही घेत असलेल्या अन्नाचा तुमच्या मनःस्थितीवर मोठा परिणाम होत असतो. ते तुम्हाला आनंदी किंवा दुःखी बनवत असते. त्यामुळे अगदी छोट्या काळासाठी टिकणाऱ्या फॅडच्या मागे जाऊ नका व तुम्हाला आनंदी ठेवणाऱ्या अन्नपदार्थांपासून दूर जाऊ नका.

  • तुमचे दिवसभराच्या खाण्याचे वेळापत्रक आखा. त्यामुळे पुढच्या क्षणी एखादा अनारोग्यकारक पदार्थ खाल्ल्यामुळे तुमच्यावर डोक्याला हात लावण्याची वेळ येणार नाही.

  • फळांमुळे तुमच्या शरीरातील सिरोटोनिन बाहेर पडत असते. त्यामुळे घरात फळांचा भरपूर साठा असू द्या.

  • दिवसभराच्या कामासाठी ताकद आणि ऊर्जा मिळण्यासाठी आहारात प्रोटिन्सचा समावेश ठेवा.