शरीराबरोबर मनाचा व्यायामही गरजेचा 

Shradha-Kakkad
Shradha-Kakkad
Updated on

वेलनेस माझ्यासाठी लाइफ स्टाईल आहे. शरीराबरोबरच मनानंही फिट राहणं गरजेचं आहे. अभिनय वा मॉडेलिंग क्षेत्रातील लोकांनीच फिटनेस जपला पाहिजे असं नव्हे. प्रत्येकानंच आपलं शरीर स्वच्छ, तंदुरुस्त व फिट ठेवणं गरजेचं आहे. आपल्या शरीरामध्ये आपला आत्मा राहतो, त्यामुळं प्रत्येकानंच आपलं शरीर घरासारखं स्वच्छ, सुंदर, आनंदी ठेवलं पाहिजे. 

मी सकाळी सात वाजता फंक्‍शनल ट्रेनिंग, योगा व वेट ट्रेनिंगवर लक्ष देते. ईशा फाउंडेशनची सूर्यक्रिया करते. सद्‍गुरू मेडिटेशनचे गुरू आहेत. आपण करीत असलेला व्यायाम मन व शरीरासाठी महत्त्वाचा आहे. योगासनांचा मला खूप फायदा होतो. त्यातून मला आनंद आणि ऊर्जाही मिळते. शरीराबरोबरच मनाचाही व्यायाम गरजेचा आहे. त्यामुळं मी इनर इंजिनिअरिंग व विपश्‍यनाही करते. प्रत्येकानं स्वतःला मानसिकदृष्ट्या फिट, सुखी ठेवण्यासाठी सुख वा दुःखात भगवान गौतम बुद्ध म्हणतात त्याचप्रमाणे ‘इट विल पास’ असंच राहावं. परिस्थितीनुसार स्वतःला बदलावं. त्यामुळं आपल्याला चांगल्या पद्धतीनं परिस्थिती हाताळता येते. मी मार्शल आर्ट व सेल्फ डिफेन्सही शिकले आहे. त्याचा मला सौंदर्यस्पर्धा व मॉडेलिंगमध्ये उपयोग होतो. मी सकाळी उठल्यावर कोरफड आणि आवळ्याचा रस पिते. त्यानंतर दोन-तीन अंडी, सफरचंद खाते. बुलेट कॉफी पिते. अकरा वाजता कच्च्या पालेभाज्यांचा रस घेते. सकाळच्या जेवणात पालक, वरण, फुलका खाते. दुपारी तीन-चारच्या दरम्यान ताक पिते. संध्याकाळी सात वाजता फक्त भाजी खाते. भात किंवा पोळी खात नाही. तुम्ही जे खाता, तेच तुम्ही बनता, असं सद्‍गुरू म्हणतात. त्यानुसार मी हेल्दी राहण्यासाठी आहार घेते. मला कोणत्याही प्रोजेक्‍टसाठी वजन कमी वा जास्त करण्याची वेळ आली नाही. सध्या मी ‘झी फाइव्ह’ची वेबसीरिज करते आहे. यापूर्वी मी ‘मिसेस युनायटेड नेशन्स’ या २०१८ मध्ये अमेरिकेत झालेल्या सौंदर्य स्पर्धेत विजेती ठरले. मी ‘कजरी’ साडीची जाहिरातही केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com