गरीबांचे बदाम असलेले शेंगदाणे भिजलेली खा, आरोग्यास एकापेक्षा जास्त होईल फायदा

सुस्मिता वडतिले 
Friday, 11 September 2020

आपल्याला बऱ्याच वेळा जेव्हा भूक लागते तेव्हा आपण बाहेरचं काही तरी अनहेल्दी खाण्यास जातो. तुमच्या या भूकेला आणखीन एक पर्याय म्हणजे शेंगदाणे आहे. शेंगदाणे हे जास्त महाग नसून ते सहज उपलब्ध होतात, म्हणून शेंगदाणे हे गरीबांचे बदाम असतात. बदामात मिळणारी सर्व पोषण द्रव्य शेंगदाण्यात आहेत. त्यामुळे भिजवलेले शेंगदाणे खाल्ले तर आरोग्यास एकापेक्षा जास्त फायदे मिळतात. 

पुणे : प्रत्येकांच्या घरांमध्ये शेंगदाणे असतातच. त्याचा वापर आपण स्वयंपाकमध्ये भाजी बनवताना रोजच करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, त्याचे आणखीन खूप फायदे आहेत. याचा तुम्ही कधी विचार केला आहे का, रात्री भिजून सकाळी खाल्लेले शेंगदाणे आपल्या आरोग्यास किती फायदेशीर ठरतात. रोज रात्री काहीजण बदाम भिजवून सकाळी खातात. कारण बदामाचे एकापेक्षा जास्त फायदे असतात, जे आपल्याला निरोगी ठेवतात. परंतु आपण बदामाऐवजी कधी शेंगदाणे खाऊन पाहिल आहे का? जर रात्री शेंगदाणे भिजवल्यानंतर सकाळी खाल्ले तर आरोग्यास खूप चांगले फायदे होतात. आपल्याला ओले शेंगदाणे अधिक फायदेशीर कसे आहेत ते जाणून घ्या.

आपल्याला बऱ्याच वेळा जेव्हा भूक लागते तेव्हा आपण बाहेरचं काही तरी अनहेल्दी खाण्यास जातो. तुमच्या या भूकेला आणखीन एक पर्याय म्हणजे शेंगदाणे आहे. शेंगदाणे हे जास्त महाग नसून ते सहज उपलब्ध होतात, म्हणून शेंगदाणे हे गरीबांचे बदाम असतात. बदामात मिळणारी सर्व पोषण द्रव्य शेंगदाण्यात आहेत. त्यामुळे भिजवलेले शेंगदाणे खाल्ले तर आरोग्यास एकापेक्षा जास्त फायदे मिळतात. 

हृदयासाठी उत्तम...

ओले शेंगदाणे हे रक्ताभिसरण नियंत्रित करत असतात. तसेच हृदयविकाराच्या झटक्याने शरीराच्या अनेक समस्यांपासून शरीराचे रक्षण करतात. म्हणून हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी भिजवलेले शेंगदाणे खाणे नेहमीच फायद्याचे असते.  

स्नायू (मसल्स) टोंड करतात... 

आपण आपल्या शरीराच्या कुटिल स्नायूंबद्दल काळजी करत आहात तर दररोज भिजवलेले शेंगदाणे खा. यामुळे हळू हळू तुमचे स्नायू (मसल्स) टोंड होतील. 
 
गैस आणि अॅसिडिटी होईल दूर...

शेंगदाणे भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खाल्ले तर पोटॅशियम, मॅंगनीज, तांबे, कॅल्शियम, लोह, सेलेनियम यातील गुणांमुळे गॅस व अॅसिडिटी दूर होते. 

गैस आणि अॅसिडिटी बरं करेल...

हिवाळ्यात, जड जेवण केल्यावर पोट फुगते. यामुळे आपण नाश्ता आणि दुपारचे जेवण करू शकत नाही. यावर उपाय म्हणून दररोज रात्री मुठभर शेंगदाणे  भिजवून सकाळी उठून खाऊन घ्या. 

सांधेदुखी आणि पाठदुखीमुळे आराम मिळतो... 

हिवाळ्यात, पाठदुखी आणि सांधेदुखीमुळे खूप त्रास होतो. अशा परिस्थितीत शेंगदाणे आपल्याला या आजारापासून आराम देऊ शकतात. थोडेसे गूळ घालून भिजवलेले शेंगदाणे खा. हे खाल्यावर सांधेदुखी आणि पाठदुखीमुळे आराम मिळतो. 

स्मरणशक्ती वाढवते...
 
रात्री भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने त्यातील जीवनसत्त्वे आपल्या डोळ्यांतील दृष्टी आणि स्मरणशक्ती उज्ज्वल करतात. शेंगदाणे खाल्ल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाणही वाढते. याशिवाय यामुळे शारिरीक उर्जा ही चांगली राहते. 

कर्करोगाच्या पेशीविरूद्ध लढायला करतात मदत...
  
रात्री भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने अँटीऑक्सिडेंट्स, लोह, फोलेट, कॅल्शियम आणि जस्त शरीराला कर्करोगाच्या पेशीविरूद्ध लढायला मदत करतात. म्हणूनच दररोज मूठभर भिजलेले शेंगदाणे खाल्यास आरोग्यास फायदेशीर ठरतात. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soaking peanuts at night and eating them in the morning has more than one health benefit