esakal | चेतना तरंग : गोपाल व्हा...
sakal

बोलून बातमी शोधा

Child

चेतना तरंग : गोपाल व्हा...

sakal_logo
By
श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग

सागरापर्यंत पोचण्यासाठी तुम्ही चालाल. एकदा समुद्रापाशी पोचलात, की तुम्ही समुद्रावर चालत अथवा पळत नाही. तुम्ही पोहाल आणि लाटांवर तरंगाल. त्याचप्रमाणे गुरूपाशी पोचल्यानंतर जिज्ञासा व प्रयत्न थांबतात आणि तुम्ही उमलू लागता.

गुरूपर्यंत पोचण्यापुरतीच तुमची जिज्ञासा असते. जिज्ञासा किंवा आकांक्षा ही एक इच्छा आहे. इच्छा हा एक विचार आहे. विचार हे मनामध्ये उद्भवतात. मन हे मोठ्या विशाल मनाचा एक अंश असते. माझ्यातले विशाल मन हेच प्रेम आहे. भावना या प्रेमावर आलेल्या लहरी आहेत. प्रेम हे संपूर्ण ज्ञान आहे. विशाल मनाचा प्रत्येक अणू हा ज्ञानाने परिपूर्ण, तुडुंब भरलेला आहे. या तथ्याची जाणीव झाल्यावर आकांक्षाना थांबवा.

तुम्ही ज्ञानच आहात. तुमच्यातील प्रत्येक अणू ज्ञानाच्या तेजाने चमकत आहे. संस्कृतमध्ये याला ‘गो’ असे संबोधतात. ‘गो’ या शब्दाचे चार अर्थ आहेत.

  • ज्ञान

  • गती

  • सफलता

  • मुक्ती अथवा स्वातंत्र्य

‘पाल’ म्हणजे मित्र किंवा संरक्षक – जो आपले रक्षण करतो. तुम्ही गोपाल व्हा; ज्ञानाचे मित्र व्हा.

आपली मैत्रीची कारणे...

  • नकारात्मक गोष्टींबद्दल गप्पा मारणे

  • तक्रारी करणे

  • एकसारख्या वासना अथवा द्वेष असणे.

  • एकसारखे शत्रू असणे किंवा एकसारखी समस्या

  • एकसारखे लक्ष्य असणे किंवा व्यसने असणे.

आपल्या सारखेच काहीतरी दुसऱ्यात असेल, तर आपण त्याचे मित्र होतो. पण ज्ञानामुळे एकत्र येणे विरळा आहे. ते क्वचित घडते. एकमेकाला ज्ञानाच्या साहाय्याने विकसित करा. ज्ञानामध्ये आणि ज्ञानामुळे मित्र व्हा. सारे सत्संगी गोपाल असतात. ते एकमेकास ज्ञानाची आठवण करून देतात, ज्ञान साधनेसाठी एकत्र येतात. गोपाल असणे हेच आहे. या ज्ञानाचे संरक्षक व्हा.

loading image