Stealth Omicron: स्टेल्थ ओमिक्रॉन कसा आहे? अशी आहेत लक्षणे!

चीनसह अनेक देशात सघ्या या व्हेरिएंटचे रूग्ण आढळत आहेत.
Stealth Omicron
Stealth Omicronsakal

Stealth Omicron: ऑमिक्रोनचा दुसरा सब व्हॅरियंट BA.2 ज्याला Stealth variant म्हणतात. सध्या अनेक देशांमध्ये त्याचा कहर सुरू आहे. नावाप्रमाणेच हा गुप्त असून BA.1 Omicron प्रकारासह अनेक सामान्य म्युटेशन यात आहेत. स्पाईक प्रोटिन गळून पडण्याबाबत फारशी प्रगती झालेली नाही. त्यामुळे हा स्ट्रेन आरटी पीसीआर चाचणीद्वारे शोधणे कठीण झाले आहे. हा स्ट्रेन शोधण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे या स्ट्रेनला स्टेल्थ म्हणजेच सिक्रेट व्हेरियंट म्हटले जाते.

Stealth Omicron
Mumbai Metro Job : इंजिनिअर्ससाठी मेगा भरती, लवकर करा अर्ज

BA.2 पेक्षा जास्त संक्रमक का आहे? - व्हायरसचा हा स्ट्रेनआरटी पीसीआरसारख्या चाचण्यांमध्ये त्याच्या अनुवांशिक रचनेमुळे शोधता येत नाही. याविषयी WHO ने सांगितले की हा प्रकार काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न संशोधनातून होत आहे. पण प्राथमिक डेटानुसार BA.1 पेक्षा BA.2 नैसर्गिकरित्या जास्त धोकादायक असून त्याचा फैलाव जास्त आहे.

Stealth Omicron
Red Wine रोज प्यायल्याने शरीरावर होतात पाच परिणाम

BA.2 च्या कोविड संक्रमणात वेगळी लक्षणं दिसतात का? - सौम्य कोरोना विषाणूच्या स्टेल्थ उपप्रकारात आतापर्यंत कोणतीही विशिष्ट लक्षणे दिसून आली नाहीत. पण हा कोरोना विषाणू वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळ्या पद्धतीने परिणाम करतो. त्यामुळे त्याचे खास प्रकार किंवा सबव्हेरियंटची लक्षणं वेगळी करणे कठीण आहे. पण, तज्ज्ञांच्या मते, स्टेल्थ विषाणूमुळे होणाऱ्या कोरोनामुळे चक्कर येणे, थकवा येणे अशी लक्षणे दिसायला लागतात. विषाणूच्या संपर्कात आल्यावर दोन ते तीन दिवसांनी लक्षणं दिसायला लागतात. कोरोनाच्या इतर सामान्य लक्षणांमध्ये सौम्य ताप, नाक वाहणे, श्वास घेण्यात अडचण, घसा खवखवणे, डोकेदुखी, अंगदुखी या लक्षणांचा समावेश होतो.

Stealth Omicron
कोरोना बरा करणारा नेझल स्प्रे लाँच ! कसा करेल काम जाणून घ्या

जगभरात BA.2 चे इंफेक्शन- सध्या चीनमध्ये BA.2 ही कोरोनाची मोठी लाट येण्यासाठी जबाबदार आहे. गेल्या काही आठवड्यात युकेमध्येही कोरोनाची प्रकरणे दिसत आहेत. जर्मनीमध्ये रोज दोन लाखांपेक्षा जास्त रूग्ण सापडत आहेत. तर फ्रान्स, स्विझर्लंड, इटली, नेदरलेंड येथे कोरोना केसेस वाढत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com