अशी वाढवा रोगप्रतिकार शक्ती

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 April 2020

कोरोनाचा फैलाव जगभर वाढला आहे. संसर्गाने होत असलेल्या या आजारापासून वाचायचे असेल तर तुमची रोगप्रतिकारशक्ती सक्षम असली पाहिजे, असे तज्ज्ञांकडून वारंवार सांगितले जाते. रोगप्रतिकार शक्ती नेमकी कशी वाढवायची, असा प्रश्‍न अनेकांना पडला आहे. रोगप्रतिकार शक्ती सक्षम ठेवण्यासाठी तुमचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले असणे गरजेचे आहे. तसेच तुम्ही सोप्या पद्धतीनेही कोरोनापासून स्वतःला दूर ठेवू शकता.

हे आवर्जून करा...

 • तुमचा दैनंदिन जीवनक्रम बदलू नका. रात्री लवकर झोपा, सकाळी लवकर उठा. 
 • कफ न वाढवणारा आहार घ्या. सात्विक आणि हलक्‍या आहारावर भर द्या. 
 • अतिमसालेदार, चमचमीत, तेलकट पदार्थ खाणे टाळा.
 • हळद ही बहुगुणी आहे. हळदीमुळे रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. दूध व पाण्यातून हळद घेतल्याने फायदा होतो. 
 • घशात खवखव वाटत असल्यास पाण्यात हळद घालून गुळण्या करा. 
 • च्यवनप्राश घेताना तो डॉक्‍टरांच्या सल्ल्यानेच घ्या. 
 • तुळशीची पाने आणि आल्याचा रस मधात घालून खाल्ल्यानेही फायदा जाणवतो. 
 • चहा वारंवार घेऊ नका. चहामुळे पित्त वाढते.
 • दुधात साखरेसोबत हळद, मिरी आणि दालचिनी समप्रमाणात घालून काढा करावा. चहाऐवजी हा काढा गुणकारी ठरतो. मधुमेह असलेल्यांनी मात्र यात साखरेचा वापर करू नका.
 • तयार मसाला जेवणात वापरू नका. घरात असलेल्या खडा मसाल्याचा वापर जेवणात करा. मसाल्याचे पदार्थ अग्नी वाढवतात. शरीरात अग्नी वाढल्याने रोगप्रतिकारशक्तीही वाढते. 

मानसिक स्वास्थासाठी हे करा

 • टीव्ही, सोशल मिडीयावर कोरोना संदर्भातील बातम्या सतत पाहू नका. त्यामुळे नकारात्मक विचार मनात येणे सुरू होते. 
 • टीव्ही, मोबाईल पाहण्यापेक्षा रिकाम्या वेळात वाचन करा. 
 • स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी करा. छंद जोपासा आणि वाढवा.

कोरोनाचा संसर्ग टाळायचा असेल तर रोगप्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी शारीरिक स्वास्थ्यासोबतच मानसिक स्वास्थ्यही जपणे गरजेचे आहे. हलक्या आणि सात्विक आहारावर भर द्या.
- डॉ. अनिकेत पाटील, एमडी आयुर्वेद

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Such an increase in immunity