
लॉकडाऊन काळात घराबाहेर न पडता आल्याने अनेकांना चिडचिडेपणाला सामोरे जावे लागले. घरातील सदस्यांवर, कुटुंबावर विनाकारण चिडचिड होत असल्याचे अनेकांना जाणवले.अनेकांना मला काही काम करता येत नाही.
चिंता आणि तणाव आपल्या आरोग्यावर खूप परिणाम करतात. लॉकडाऊन काळात घराबाहेर न पडता आल्याने अनेकांना चिडचिडेपणाला सामोरे जावे लागले. घरातील सदस्यांवर, कुटुंबावर विनाकारण चिडचिड होत असल्याचे अनेकांना जाणवले. अनेकांना मला काही काम करता येत नाही. बाहेर जाता येत नाही, अनेक अर्धवट राहिलेली कामेही पूर्ण करता येत नाहीत, अशा विचारांमुळे असहाय्यतेची भावना मनात निर्माण होत होती. त्यामुळे निराशेला सामोरे जावे लागत आहे. या सर्व मानसिक आजारांना दूर ठेवण्यासाठी हलक्या फुलक्या गोष्टी करता येऊ शकतात.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
लक्षणे जाणून घ्या...
- चिंताग्रस्त होणे, चिडचिडेपणा वाढणे, निराश वाटणे.
- काम करण्यात रस न वाटणे.
- शांत झोप न येणे, झोपल्यास खूप लवकर जाग येणे.
- मध्येच थकवा येणे किंवा सतत गळून गेल्यासारखे वाटणे.
हे लक्षात घ्या...
- परिस्थिती समजून घ्या. बाहेर घडणाऱ्या सर्व गोष्टी तुमच्यामुळे झाल्यात का? असा विचार करा. ही परिस्थिती सुरळीत करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करू शकता, याचा विचार करा.
- अनेकदा ही परिस्थिती स्वीकारली नसल्यामुळे चिडचिडेपणा वाढतो. त्यामुळे स्वीकारार्ह वृत्ती तयार करा.
- वास्तववादी, सकारात्मक विचार करा. स्वतःच्या भावना, विचार समजून घ्या.
- ध्यानधारणा, दीर्घ श्वसन ताण कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.
- परिस्थितीशी मिळतेजुळते घेण्याचा प्रयत्न करून परिस्थिती हाताळू शकता.
- नियमित व्यायाम, योग, फिरणे, पोहणे, नृत्य यामुळे शरीर सैलावते. तणाव कमी होतो.
- कौटुंबिक आयुष्य, छंद, मनोरंजन, वैयक्तिक जबाबदाऱ्या, मनन-चिंतन यासाठी वेळ देऊन त्यात समतोल साधावा.
- ताणतणावाच्या व्यवस्थापनात स्वतःच्या भावनांना आवर घालणे महत्वाचे ठरते. शाब्दिक प्रतिक्रियापेक्षा देहबोलीचा वापर करावा. आपल्याला आलेला राग चढ्या आवाजात व्यक्त करण्याऐवजी खुबीने शांत स्वरात मांडावा.
पुणे कोरोना
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सध्याच्या काळातील परिस्थिती समजून घेऊन भविष्याचा वेध घ्यायला हवा. मोकळ्या वेळेत चिंतन, मनन करण्यावर भर द्या. ठराविक वेळेत व्यायाम, दीर्घ श्वसन आणि योगासने करा.
- आम्रपाली रोहिदास, समुपदेशक