थंडीत त्वचाही कोरडी पडते. यामुळे अंघोळीला खूप गरम पाणी न वापरता कोमट पाणी वापरावे. वासाच्या साबणाऐवजी मॉइश्चरायझिंग साबण किंवा तेल नसलेला ग्लिसरीन साबण वापरावा. साधा साबण वापरल्यास कोरड्या त्वचेला भेगा पडतात आणि खाजही खूप येऊ लागते.
पावसाळा संपून हिवाळा जाणवू लागला आहे. हळूहळू ही थंडी वाढत जाईल. त्यामुळे वेळेवर योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. थंडीपासून वाचण्यासाठी गरम कपडे घाला. लहान मुलांना मोजे, हातमोजेही घाला.
हिवाळ्यात एका वर्षाखालील मुलांची खास काळजी घेणे गरजेचे असते. त्यांची छाती, पाठ, कपाळ, कानशिले सकाळी आणि रात्री हलक्या गरम कापडाने शेकल्यास त्यांना सर्दी होण्याचे प्रमाण कमी होते.
थंडीमध्ये हात धुण्याचीही काळजी घ्यावी. सर्दीचे विषाणू हातांवाटे श्वासात जाऊन सर्दी होते. हात धुतल्यास हे प्रमाण बरेच कमी होते.
गरम पाण्याची वाफ घेणे, कोमट पाण्याच्या गुळण्या करणे याचादेखील सर्दी-खोकला आटोक्यात आणायला उपयोग होतो.
थंडी वाढू लागल्यावर संधिवात असलेल्यांना तसेच सांध्यांचे काही दुखणे असणाऱ्यांना त्रास होऊ लागतो. दुखणे बरे झाले असले तरी थंडीमुळे त्याच्या वेदना वाढू लागतात. अशावेळी गरम पाण्याच्या पिशवीने शेक घेतल्यास बरे वाटू शकते. वेदना जास्त होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
थंडीत केसदेखील कोरडे पडतात. त्यामुळे शाम्पूचा वापर टाळावा. केसांना झोपण्यापूर्वी तेल लावावे अथवा केस धुतल्यानंतर लावायचे क्रीम लावावे. यामुळे केस मऊ राहतील.
थंडीत त्वचाही कोरडी पडते. यामुळे अंघोळीला खूप गरम पाणी न वापरता कोमट पाणी वापरावे. वासाच्या साबणाऐवजी मॉइश्चरायझिंग साबण किंवा तेल नसलेला ग्लिसरीन साबण वापरावा. साधा साबण वापरल्यास कोरड्या त्वचेला भेगा पडतात आणि खाजही खूप येऊ लागते.
शेवग्याच्या शेंगा भाजीत किंवा आमटीत टाकण्याची पद्धत आहे. शेवग्याच्या पानांची, फुलांची भाजीही करून खाल्ली जाते. अनेक आजारांत शेवगा औषधांसारखा गुणकारी...
नांदेड : थंडीचा जोर वाढत असल्याने पहाटे मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्याही त्याच जोमात वाढत आहे. प्रत्येक जन आपल्या कौशल्यानुसार व्यायाम करताना भल्या...