esakal | लिव्हरसंबंधित आजारांकडे करु नका दुर्लक्ष, नाहीतर...

बोलून बातमी शोधा

लिव्हरसंबंधित आजारांकडे करु नका दुर्लक्ष, नाहीतर...

लॉकडाउन व वर्क फ्रॉम होममुळे आपल्‍या शारीरिक हालचाली आणि व्‍यायामात घट झाली आहे.

लिव्हरसंबंधित आजारांकडे करु नका दुर्लक्ष, नाहीतर...
sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

बदलती जीवनशैली आणि चुकीची आहार पद्धती यामुळे त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो.  त्यातच गेल्या वर्षभरापासून यकृत आणि संबंधित आजारांच्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त यकृताशी संबंधित होणारे आजार कोणते आणि यकृत म्हणजेच लिव्हरचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी कोणती काळजी घ्यावी ते जाणून घेऊयात.

दुर्लक्ष केल्यास निर्माण होईल ही समस्या

लॉकडाउन व वर्क फ्रॉम होममुळे आपल्‍या शारीरिक हालचाली आणि व्‍यायामात घट झाली आहे. घरीच असल्‍यामुळे आपल्‍याला कॅलरीयुक्त पदार्थांचे सेवन करण्‍याची सवय लागली. या सर्व घटकांमुळे मधुमेह, उच्‍च रक्‍तदाब व लठ्ठपणा अशा आजारांमध्‍ये वाढ झाली आहे. परिणामी, फॅटी लिव्‍हर व एनएएसएच (नॉन-अल्‍कोहोलिक लिव्‍हर डिसीज) या आजारांमध्‍ये वाढ झाली. वर्षानुवर्षे फॅटी लिव्‍हर आजाराच्‍या प्रमाणामध्‍ये वाढ होत आहे आणि जवळपास 30 ते 40 टक्‍के अल्‍ट्रासाऊंड तपासण्‍यांमधून फॅटी लिव्‍हर आजारांच्या विभिन्‍न प्रकारांचे निदान झाले आहे.

तसेच सहका-यांसोबत संवाद कमी झाल्‍याचे परिणाम, नोकरी गमावण्‍याचे वाढते प्रमाण, वेतन मिळण्‍याबाबत अनिश्चितता अशा घटकांमुळे तणाव व मानसिक आरोग्‍यासंबंधित आजारांमध्‍ये वाढ होत आहे. सोबतच मादक पदार्थांचे सेवन केल्‍याने होणा-या अल्‍कोहोलिक लिव्‍हर डीसीज केसेसचे प्रमाण थेट मद्यपानाशी संबंधित आहे आणि मद्यपानामुळे अशा केसेसमध्‍ये अधिकाधिक वाढ होत जाईल अशी भीती वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे, या कोरोना महामारीच्या काळात जास्तीत जास्त यकृताची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञ करतात. 

आरोग्य चांगले राहावे म्हणून काय कराल?

१. नियमितपणे व्‍यायाम करा. 
२.कॅलरीयुक्‍त व कर्बोदकयुक्‍त आहाराचं सेवन करणे टाळा. 
३.आहारामध्‍ये हिरव्‍या पालेभाज्‍या, फळे, ड्रायफ्रुट्स आणि सलाड्सचा समावेश करा.
 ४.मानसिक आरोग्‍याकडे देखील लक्ष द्या.
५. मन आनंदी व उत्‍साही ठेवा.
 ६.नियमितपणे आरोग्‍य तपासणी करा