अक्रोड खाल, हेल्दी राहाल ! जाणून घ्या फायदे

हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी सुक्या मेव्यांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे
Walnut
WalnutWalnut

हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी सुक्या मेव्यांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. रोज सुकामेवा खाल्ल्याने हृदय, मन आणि शरीर तंदुरूस्त राहतो. सुकामेवा (Dry Fruits)खाल्ल्याने वजन कमी तर होतेच शिवाय रोगप्रतिकारक शक्तीही (Immunity Power) वाढते. तुम्ही रोज दोन ते तीन अक्रोड खाणे गरजेचे आहे. अक्रोड खाल्याने तुमचा मेंदू तीक्ष्ण आणि सक्रीय होतो. अक्रोडामध्ये प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशिएअम, लोह, तांबे आणि सेलिनियम यासारखी पोषकद्रव्ये असतात. त्यामुळे अक्रोड खाल्याने हृदय निरोगी आणि तंदुरूस्त राहते. त्यामुळे अक्रोड खाल्याने तुमच्या शरीराला अनेक फायदे होतात.

 Mental Health
Mental Healthsakal

आरोग्यासाठी अक्रोड खाण्याचे असे आहेत १० फायदे (Top 10 Benefits Of Walnut For Health) -

१) अक्रोड खाल्ल्याने मेंदूची शक्ती वाढतेय यातील पोषक द्रव्ये मेंदूची तीक्ष्णता वाढवतो

२) अक्रोडमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिड असतात. जे हृदयरोगांवर गुणकारी असतात. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार दूर राहतात.

३) मेंदूसाठी अक्रोड खाणे अत्यंत चांगले आहे. ते खाऊन तुम्ही तणावमुक्त राहता शिवाय चांगली झोप लागते.

४) अक्रोड खाल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. त्यामुळे शरीरातील उर्जा कायम राहते.

५) शरीरातील कॉलेल्टरोलचे संतुलन अक्रोड खाल्याने होऊ शकते.

Walnut
हिवाळ्यात 'हे' पदार्थ मुलांना खायला द्या, रोगप्रतिकारशक्ती वाढेल
अक्रोड
अक्रोडesakal

६) अक्रोडमध्ये ओमेगा ३ फॅटी अल्फा लिनोलेनिक एसिड असते. ते शरीरात रक्ताची गुठळी तयार करते. त्यामुळे जखम झाली तर फार रक्त वाहत नाही.

७) नियमित अक्रोड खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो. तसेच कॅंसर होण्याचा धोकाही कमी होतो. अक्रोड खाल्याने त्वचा चमकदार आणि केस मजबूत होतात.

८) अक्रोडमध्ये बायोटिन आणि व्हिटॅमिन ३२ असते. त्यामुळे केस गळण्याची समस्या कमी होते.

९) मधुमेह असलेल्यांना अक्रोड खाल्ल्याने फायदा होतो. टाईप 2 मधुमेहासाठी हे खूप प्रभावी आहे. अक्रोड रक्तवाहिन्या विस्तृत करतात आणि मेटाबॉलिक सिंड्रोम कमी करतात.

१०) गरोदरपणात अक्रोड खाल्ल्याने बाळाला आवश्यक पोषक द्रव्ये मिळतात.

Walnut
हिवाळ्यात कर्ली हेअर्सची चिंता सतावतेय, अशी घ्या काळजी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com