'ही' लक्षणे दिसल्यास तुम्हाला असू शकतो हायपरटेन्शनचा धोका

हायपरटेन्शन म्हणजे काय?
hypertension
hypertension

सध्याच्या काळातील प्रत्येक व्यक्ती घड्याळाच्या काट्याप्रमाणे धावत आहे. त्यामुळे जेवणाच्या अनियमित वेळा, अपुरी झोप या सगळ्याचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होतो. त्यातूनच मग उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन (hypertension), हृदयविकार, अर्धांगवायू आणि मूत्रपिंडाच्या समस्या, या आणि अशा अनेक तक्रारी डोकं वर काढू लागतात. त्यातच पाहायला गेलं तर १० पैकी ७ जण हे वरील शारीरिक व्याधींनी त्रस्त आहेत. त्यातच गेल्या काही काळामध्ये नागरिकांमधील हायपरटेन्शनचं प्रमाण सर्वाधिक वाढल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळेच हायपरटेन्शन म्हणजे काय?, त्याची कारणं काय?, किंवा त्यावरील उपाय काय? हे कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमधील कार्डिओलॉजी डॉ. प्रविण कहाळे यांनी सांगितलं आहे. (the cause and symptoms of hypertension)

हायपरटेन्शनचा त्रास सुरु होण्यामागची कारणे

मद्यपान करणे

धुम्रपान करणे

मीठाचा अतिरिक्त वापर करणे

शरीराची योग्य हालचाल न होणे.

सतत विचार करणे.

हायपरटेन्शनची सामान्य लक्षणे

हायपरटेन्शनला 'सायलेंट किलर' असे म्हटले जाते. हायपरटेन्शन असलेल्या बहुतांश व्यक्तींना आपल्याला हा आजार झाला आहे याची कल्पनाच नसते. कारण, त्यांना काहीच लक्षणे जाणवत नसतात. हायपरटेन्शनच्या सामान्य लक्षणांमध्ये - सकाळी उठताच डोकेदुखी सुरु होणे, नाकातून रक्त येणे, हृदयाचे ठोके अनियमित होणे, नीट न दिसणे आणि कानामध्ये गुणगुणल्यासारखा आवाज येणे यांचा समावेश आहे. गंभीर स्वरूपातील हायपरटेन्शनमुळे थकवा येणे, मळमळणे, उलट्या होणे, काहीही नीट न सुचणे, चिंता वाटणे, छातीत दुखणे आणि स्नायू कंप असे त्रास होऊ शकतात.

hypertension
'अभ्यास करुन डोकं खराब झालंय'; चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल

अनियंत्रित हायपरटेन्शनमुळे निर्माण होणारी गुंतागुंत

खूप वाढलेला दाब आणि कमी झालेला रक्त प्रवाह यामुळे छातीत दुखणे (याला एनजाइना असेही म्हणतात), हृदयाच्या स्नायूंमध्ये रक्ताची गुठळी होणे, हृदयामध्ये रक्त येणे आणि बाहेर पाठवले जाण्याची गती (इजेक्शन फ्रॅक्शन) कमी झाल्यामुळे हृदय निकामी होणे, हृदयाचे ठोके अनियमित होणे, यामुळे अचानक मृत्यू देखील ओढवू शकतो. मेंदूला रक्त आणि प्राणवायूचा पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या हायपरटेन्शनमुळे फुटू शकतात किंवा ब्लॉक होऊ शकतात, यामुळे अर्धांगवायूचा झटका येऊ शकतो. हायपरटेन्शनमुळे किडनीचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे किडनी निकामी होण्याचा धोका असतो.

हायपरटेन्शनवर नियंत्रण कसं मिळवाल?

१. खाण्यामध्ये मिठाचे प्रमाण कमी ठेवणे (दररोज ५ ग्रॅमपेक्षा कमी)

२. फळे व भाज्या जास्त प्रमाणात खाणे.

३. शारीरिकदृष्ट्या नियमितपणे सक्रिय राहणे.

४. तंबाखूचे सेवन, वापर टाळणे.

५. मद्यपान कमी करणे.

६. ज्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स जास्त आहेत असे खाद्य पदार्थ मर्यादित प्रमाणात खाणे.

७. आहारात ट्रान्स फॅट्स नसावेत किंवा कमी असावेत.

हायपरटेन्शनचं व्यवस्थापन कसं कराल?

१. मानसिक ताणतणाव कमी करणे आणि त्यांचे व्यवस्थापन

२. रक्तदाब नियमितपणे तपासणे.

३. उच्च रक्तदाब असल्यास त्यावर उपचार करून घेणे.

४. इतर काही वैद्यकीय समस्या असल्यास त्यावर उपचार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com