कोरोना काळात फुफ्फुसांची घ्या काळजी, 'हे' ५ पदार्थ खाणे टाळा | Harmful Food for Lung | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना काळात फुफ्फुसांची घ्या काळजी,  'हे' ५ पदार्थ खाणे टाळा

कोरोना काळात फुफ्फुसांची घ्या काळजी, 'हे' ५ पदार्थ खाणे टाळा

Harmful Food for Lung: आज तुम्हाला अशा पदार्थांबाबत सांगणार आहोत जे फुफ्फुसांना थेट नुकसान पोहचवू शकते. हेल्थ एक्सपर्टनुसार, फुफ्फुसांचे कार्य अधिक चांगल्या पध्दतीने करू शकते. फुफ्फुस खराब झाल्यामुळे तुमचे शरीरला शुध्द ऑक्सिजन मिळवण्यास अडथळा येऊ शकतो.

कोरोना काळात फुफ्फुसांचे आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण कोरोना व्हायरस सर्वात आदी फुफ्फुसांवर हल्ला करतो.

काय सांगतात डाएट एक्सपर्ट

डाइट एक्पसर्ट नुसार, फुफ्फसांना निरोगी राखण्यासाठी हेल्दी डाएट ट (Healthy Diet) गरजेचे आहे. काही असे घटक आहे जे फुफ्फुसांना कमजोर बनवू शकतात, तुम्हाला त्यापासून दूर राहायला पाहिजे. धुम्रपान आणि तंबाकूशिवाय प्रोसस्ड मीट, भरपूस साखर असलेले ड्रिंक्स, आणि अति मद्यपान यांचाच समावेश असतो. या पदार्थांच्या सेवनामुळे तुमचे फुफ्फस खराब होऊ शकतात त्यांच्यापासून तुम्हाला लांब राहायला हवे. त

हेही वाचा: Kolhapur: बाळाच हृदय तंदुरुस्त झालं, घर आनंदान डोलू लागलं

फुफ्फुसांना नुकसान पोहचविणारे पदार्थ (Harmful Food for Lung)

अतिमद्यपान

दारू फुफ्फुसांनासाठी नुकासानदायक असते. त्यामध्ये असलेले सल्फाईट अस्थमाच्या लक्षणांना वाढवू शकते आणि दारूमध्ये इथेनॉल देखील उपलब्ध असते जे फुफ्फुसांना नुकसान पोहचवू शकते. अशावेळी अति दारू पिणे टाळले पाहिजे.

डेअरी प्रोडक्ट्सचे अति सेवन

डेअरी प्रॉक्टड जसे की दुध, दही, आणि पनीर आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात पण तुम्ही त्यांचे अतिप्रमाणात सेवन केले तर तर फुफ्फुसांसाठी ते नुकासानदायी ठरू शकते. त्यामुळे डेअरी प्रॉडक्टचे अति प्रमाणात सेवन टाळा

मीठ

आरोग्यासाठी मीठ खूर गरजेचे आहे पण त्याचे एक ठराविक प्रमाण आहे जे आरोग्यासाठी गरजेचे आहे. गरजेपेक्षा जास्त मीठाचे सेवन केल्यास फुफ्फुसांना त्रास होऊ शकतो. यामुळे फुफ्फुसांना हेल्दी ठेवण्यासाठी अतिप्रमाणात मिठाचे सेवन करू नका.

हेही वाचा: वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा ढकलल्या पुढे

साखरे असलेले ड्रिंक

फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी साखरेचे असलेले ड्रिंक फुफ्फुसांसाठी नुकासानदायक असतात कारण प्रौढ लोकांना ब्रोंकाईटिस होण्याची शक्यता आहे. शुगर असलेल्या ड्रिंक्सपासून लांब राहा. त्यापेक्षा तुम्ही हवे तितके पाणी प्या.

प्रोसेस्ड मीट खा

प्रोसेस्ड मीट फुफ्फुसांसाठी अजिबात चांगले नाही असे मानले जाते. कारण हे मीट प्रिझर्व करण्यासाठी नायट्राईट नावाचे तत्व वापरले जाते ज्यामुळे फुफ्फुसांना सुज आणि ताण येतो. अशामध्ये प्रोसेस्ड मीट सारखे बेकन, हॅम, डेली मांस आणि सॉसेज इं पदार्थ खाणे टाळले पाहिजे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top