काळं गाजर खाल्लय का? आहेत पाच फायदे Black Carrot Benefits | | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

black carrot
काळं गाजर खाल्लय का? आहेत पाच फायदे Black Carrot Benefits |

काळं गाजर खाल्लय का? आहेत पाच फायदे Black Carrot Benefits

अनेक घरांमध्ये लाल किंवा केशरी गाजराचा उपयोग केला जातो. हीच गाजरं मोठ्या प्रमाणात खाल्ली जातात. पण अनेकांना काळ्या गाजराविषयी (Black Carrot) फार माहिती नसते. काळ्या गाजराचा भारत, अफगाणिस्तान आणि तुर्कीत उगम झाला आहे. जगाच्या प्रत्येक भागात काळे गाजर घेतले जातात. बीटा कॅरोटीनमुळे केशरी किंवा पिवळ्या गाजरांना लाल रंग असतो, परंतु काळ्या गाजरांमध्ये अँथोसायनिन रसायन आढळते, त्यामुळे त्याचा रंग काळा होतो. काळ्या गाजरमध्ये कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्याची क्षमता असते. तसेच त्याचे इतरही काही फायदे असतात.

असे आहेत फायदे

१) काळ्या गाजरात भरपूर प्रमाणात फायबर (Fyber) असते. ज्यामुळे पचनसंस्थेला चालना मिळते. काळ्या गाजराचा आहारात वापर केल्याने रक्त शुद्ध होते तसेच रक्ताभिसरणही चांगले राहते. काळ्या गाजरामुळे बद्धकोष्ठता, गॅस.छातीत जळजळ, सूज येणे, जुलाब आदी समस्या दूर होतात.

२) काळ्या गाजराच्या सेवनाने रोगप्रतिकारक (Immunity) शक्ती वाढते. बॅक्टेरिया आणि व्हायरस नष्ट करण्याची क्षमता या गाजरात असते. तसेच सर्दी आणि फ्लूपासून संरक्षण मिळते. यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन सीमुळे रक्तातील पांढऱ्या रक्त पेशींची संख्या वाढते. यामुळे शरीराला रोगापासून संरक्षण मिळते.

black carrot

black carrot

३) काळ्या गाजरात कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्याची क्षमता असते. त्यात अँथोसायनिन एंथोसाइनिन (anthocyanin) रसायन असल्याने ते दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. याशिवाय काळ्या गाजरात अनेक प्रकारेच अँटिऑक्सिडंट्स असतात. जे शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात.

४) केशरी गाजराप्रमाणे काळ्या गाजरात भरपूर प्रमाणात व्हीटॅमिन ए असते. व्हिटॅमिन ए मुळे डोळ्यांची दृष्टी वाढते. यात असलेल्या बीटा कॅरोटिन डोळ्यांसाठी चांगले असते. काळे गाजर नियमित खाल्ल्याने चष्म्याचा नंबर कमी होतो. तसेच डोळ्यांचे आरोग्य वाढते.

५) काळे गाजर खाल्ल्याने अल्झायमरपासून वाचता येते, असे काही अभ्यासात सांगितले आहे. यामुळे न्यूरोलॉजिकल आजार होण्याचा धोका कमी होतो. यासाठी गाजरात असलेले अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँथोसायनिन महत्त्वाची भूमिका बजावते.

Web Title: This Five Health Benefits Of Black Carrot You Must Try

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :health news
go to top