esakal | विचारचक्र आणि स्ट्रेस
sakal

बोलून बातमी शोधा

विचारचक्र आणि स्ट्रेस

विचारचक्र आणि स्ट्रेस

sakal_logo
By
देवयानी एम., योगप्रशिक्षक

तुमच्याकडं पाळलेलं कुत्रं किंवा मांजर आहे का? ते पिल्लू असताना आणलं, त्याला खायला घातलं, वेळोवेळी औषधोपचार केले, प्रेम दिलं, गोंजारलं, त्याच्याबरोबर खेळलात, त्याचा सांभाळ केला आणि एक दिवस ते तुम्हालाच येऊन कचकन् चावलं तर कसं वाटेल? अरे, मी पाळलेलं मलाच नुकसान करत आहे! आपलं मन कधीकधी (बऱ्याचदा) असंच करतं. त्याच्याबरोबर आपण लहानाचे मोठे झालो, त्याला वेळोवेळी गोंजारलं, सांभाळलं, हवं नको ते दिलं, पण अनेक प्रसंगी ते आपलंच दुश्मन बनतं.

विचारचक्र आणि स्ट्रेस

गेल्या वर्षभरात अनेक जणांकडून गांगरलेल्या, गोंधळलेल्या आवाजात, ‘पुन्हा लॉकडाउन होणार आहे का?’, ‘असं म्हणतात बाबा’, ‘तुम्हाला काही माहिती आहे का?’, ‘खरंच लॉकडाउन होणार आहे का?’ असे ढीगभर प्रश्न एकमेकांना आणि मलाही विचारताना ऐकलं. जी गोष्ट अजून घडलेलीच नाही, नियमावली जाहीर झाली नाही, खात्रीशीर बातमी अजून बाहेर आली नाही त्याच्या आत आपले विचार व आपलं मन सैरावैरा धावत सुटलं. गोंधळ, अतिविचार आणि त्यामुळं स्ट्रेस असे चक्र चालू होऊ लागतं. अनावश्यक विचारांनी उगीचंच डोक्यातली जागा अडून बसते. म्हणजे बाहेर गोष्टी घडायच्या आत आपल्या मनात निर्माण होऊन, मोठ्या होऊन, उच्छाद मांडू लागतात. याची काहीच गरज नसते खरंतर. लॉकडाउन झाला तर जे करायला लागणार आहे, ते तुम्ही करणारच आहात. प्रत्यक्ष घटना घडायच्या आधी त्याची रंगीत तालीम मनात सुरू होते. अशा प्रकारे विचारांची भुणभुण हरप्रसंगी होत गेली, तर हळूहळू मन अशा पॅटर्नच्या आहारी जायला लागते.

आता हे विचारांचं चक्र थांबवायचं कसं, याबद्दल आपण पुढील लेखात जाणून घेऊयात.

loading image