डार्क सर्कल होण्यामागे आहेत ही 3 मोठी कारणे

डोळ्यांखालील डार्क सर्कल चेहऱ्याचे सौंदर्य खराब करतात.
dark circles
dark circlesesakal
Updated on
Summary

आपल्या त्वचेचे आरोग्य बर्‍याच कारणांमुळे बिघडू लागते आणि त्यामुळे डोळ्यांभोवतीची त्वचा अधिक संवेदनशील असते. त्यामुळे डोळ्यांखाली डार्क सर्कल लवकर येऊ लागतात.

डोळ्यांखालील डार्क सर्कल चेहऱ्याचे सौंदर्य खराब करतात. इतकेच नाही तर डार्क सर्कल असणे हे तुमच्या त्वचेचे आरोग्य बिघडत असल्याचा पुरावा आहे. वास्तविक, आपल्या त्वचेचे आरोग्य बर्‍याच कारणांमुळे बिघडू लागते आणि त्यामुळे डोळ्यांभोवतीची त्वचा अधिक संवेदनशील असते. त्यामुळे डोळ्यांखाली डार्क सर्कल लवकर येऊ लागतात. चला तर मग डार्क सर्कल ची 3 सर्वात मोठी कारणे जाणून घेऊया आणि प्रत्येक कारणासाठी प्रभावी उपाय ते ही पाहूया.

थकवा

जेव्हा तुम्हाला अनेक आठवडे पुरेशी झोप मिळत नाही आणि कामाचा ताण वाढत जातो. तेव्हा तुमच्या डोळ्यांना थकवा जाणवू लागतो. त्यामुळे पापण्यांवर सूज आणि डोळ्यांखाली खड्डे वाढतात.

उपाय- रोज आरामदायी व्यायाम करा. यासाठी दीर्घ श्वासोच्छ्वासाचाही ( डीप ब्रीदिंग ) उपयोग होऊ शकतो.

अ‍ॅलर्जी

जर तुम्ही नुकताच डोळ्यांचा नवीन मेकअप किंवा मस्करा वापरण्यास सुरुवात केली असेल तर त्यामुळे डार्क सर्कल होऊ शकतात. कारण, मस्करा किंवा डोळ्यांच्या मेकअपमध्ये असलेले केमिकल डोळ्यांच्या पाण्यात जाऊ शकतात. त्यामुळे डोळ्यात पाणी येणे, लाल व सुजलेले डोळे आणि डार्क सर्कल होऊ शकतात.

उपाय- सुमारे दोन ते तीन आठवडे डोळ्यांचा मेकअप बंद करा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दिवसातून तीनदा अँटीहिस्टामाइन आयड्रॉप्स वापरा. जर आराम मिळत नसेल तर डॉक्टरांना भेटा.

अनुवांशिक

जर तुमच्या पालकांच्याही डोळ्यांखाली डार्क सर्कल असतील तर तुमच्याही डोळ्यांखाली डार्क सर्कल असू शकतात. कारण, अनुवांशिकदृष्ट्या, तुमच्या त्वचेला हायपरपिग्मेंटेशन आहे, ज्यामुळे डोळ्यांखालील त्वचा काळी पडू लागते.

उपाय- रात्रीच्या वेळी मॉइश्चरायझिंग क्रीम, कन्सीलर इत्यादींचा वापर करा.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com