तुम्हाला माहित आहे का झोपेचे गणित? कोणत्या वयात किती झोप घ्यावी? घ्या जाणून

टीम ईसकाळ
Thursday, 24 September 2020

बऱ्याचदा लहान मुल रात्रीची झोपत नाही. त्यावेळी मोठी माणसे म्हणतात की, बाळाची झोप कमी आहे. बाळ झोपतच नाही आणि यामुळेच बाळाची चिडचिड होते. पण, बाळाबाबतच नाही तर सर्वांची झोपण्याची एक वेळ असते. विशेष म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा वयानुसार झोप घेतो.

नागपूर : झोप सगळ्यांनाच प्रिय असते. अलिकडे मात्र बदलत्या जीवनशैलीत कामाच्या वाढत्या ताणामुळे पुरेशी झोप मिळणे अशक्य होऊन बसले आहे. कार्पोरेट कल्चरमध्ये १६ ते १८ तास काम करावे लागते. परिणामी झोप कमी होते आणि त्याचे दुष्परिणाम शारीरिक व मानसिक आरोग्यावर होतात. हे सगळे टाळायचे असेल तर आपल्या वयाला आवश्यक तेवढी झोप घेतलीच पाहिजे.

बऱ्याचदा लहान मुल रात्रीची झोपत नाही. त्यावेळी मोठी माणसे म्हणतात की, बाळाची झोप कमी आहे. बाळ झोपतच नाही आणि यामुळेच बाळाची चिडचिड होते. पण, बाळाबाबतच नाही तर सर्वांची झोपण्याची एक वेळ असते. विशेष म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा वयानुसार झोप घेतो. चला तर जाणून घेऊया वयानुसार किती वेळ झोप घेणे आवश्यक असते.

नवजात ते ३ महिने
नवजात बाळ ते ३ महिन्याचे बाळ यांना दिवसातून १४ ते १७ तास झोप घेणे आवश्यक आहे.

४ ते ११ महिन्यांचे बाळ
चार महिन्यांचे बाळ ते अकरा महिन्यांच्या बाळाला १२ ते १५ तास झोप घेणे आवश्यक आहे.

१ वर्ष ते २ वर्ष
एक वर्ष ते दोन वर्ष ११ ते १४ तास झोप घेणे आवश्यक आहे.

३ ते ५ वर्ष
३ ते ५ वर्षाच्या मुलांना १० ते १३ तासाच्या झोपेची आवश्यकता असते.

६ वर्ष ते १३ वर्ष
सहा ते १३ वर्षांच्या मुलांना ९ ते ११ तासांच्या झोपेची आवश्यकता असते.

चौदा ते सतरा वर्षे
चौदा वर्ष ते सतरा वर्षाच्या मुलांना ९ ते ११ तासाच्या झोपेची आवश्यकता असते.

अठरा ते ६४ वर्षे
१८ वर्ष ते ६४ वर्षाच्या व्यक्तींना ८ ते ९ तासाच्या झोपेची आवश्यकता असते.

६५ ते पुढील
६५ ते पुढील व्यक्तींना ७ ते ८ तासाच्या झोपेची आवश्यकता असते.
 

सविस्तर वाचा -  कशी आहे फुलपाखरांची रंगीबेरंगी दुनीया?

एकूणच किमान आठ तासांच्या झोपेची आवश्यकता प्रत्येकच व्यक्तीला असते. कारण पुरेशी झोप झाल्यानंतरच मेंदुला आराम मिळतो आणि मेंदु कार्यक्षम राहू शकतो. त्यामुळे झोपेच्या वेळा सांभाळूनच कामाचे वेळापत्रक करावे. जेणेकरून शारीरिक आणि मानसिक आजारांपासून आपण दूर राहू शकू.

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Time table of sleep