प्राणायामाचे प्रकार आणि परिणाम कोणते?

प्राणायाम करताना कोणती काळजी घ्यावी?
pranayam
pranayam

प्राणायाम म्हणजे काय हे आपण आधीच्या लेखात जाणून घेतलं. या दुसऱ्या भागात आपण प्राणायामाचे प्रकार कोणते आणि त्यांच्या परिणामांबाबत माहिती जाणून घेऊयात. (types benefits and what care should be taken while doing pranayam)

प्राणायामाचा परिणाम

प्राणायामाच्या अभ्यासाने चित्तातील रजोगुण आणि तमोगुण कमी होतात. भोगवृत्ती, वासना यांचे आवरण क्षीण होते. चित्तातील सत्त्वगुण वृद्धिंगत होऊन मनाची विषयाकडे (materialistic things) धावण्याची ओढ कमी होते आणि सहजच पुढील प्रवास म्हणजे पाचवे अंग ‘प्रत्याहार’ यासाठी योग्यता प्राप्त होते.

प्राणायाम करताना कोणती काळजी घ्यावी?

-प्राणायाम करताना घाई करू नये.

-नवे प्रयोग करू नयेत.

-प्राणायाम करताना कोणताही त्रास झाला, थकवा किंवा अस्वस्थता जाणवली तर लगेचच तो बंद करावा.

-टीव्ही, इंटरनेटवरून न शिकता तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शिकावे.

pranayam
प्राणायाम म्हणजे काय? जाणून घ्या अर्थ

प्राणायामाचे प्रकार

महर्षी पतंजली कुठल्याही प्राणायामाचे नाव न घेता, त्याचे चार प्रकार सांगतात. फुफ्फुसातून बाहेर सोडला जाणारा श्वास म्हणजे ‘बाह्य वृत्ती’. आत घेतला जाणारा श्वास म्हणजे ‘अभ्यंतर वृत्ती’. श्वास-प्रश्वास यांच्यानंतर काही काळ टिकणारी अशी स्तब्ध अवस्था म्हणजे ‘स्तंभ वृत्ती’. या तीन अवस्थेतील श्वास हा ‘देश’, ‘काल’ आणि ‘संख्या’ या तीन घटकांच्या संयोगाने मिळून प्राणायाम बनतो.

काल : तो किती वेळ आत किंवा बाहेर टिकतो?

संख्या : श्वासाची अशी किती आवर्तने होतात?

या तीन घटकांच्या संयोगात सर्व प्रकारचे प्राणायाम समाविष्ट होतात.

बाहेर किंवा आत अशा कोणत्याही देशाची अपेक्षा न ठेवता केवळ स्तब्ध आहे, असा श्वास म्हणजे ‘केवल कुंभक’. परंतु, ही अवस्था आपोआप येते, ज्यावेळी एकाग्र, विचारशून्य अशा सूक्ष्म अवस्थेत आपण पोहोचतो! मनाची चंचलता आणि वृत्ती शांत झाल्या की, प्राणवृत्तीदेखील सहजरीतीने सूक्ष्म होऊन स्थिर होतात आणि केवल कुंभक होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com