मूत्रमार्गाच्या संसर्गामुळेही उद्भवू शकते वंध्यत्वाची समस्या, पुरुषांपेक्षा महिलांमध्ये सर्वांत जास्त प्रमाण

Urinary Tract Infections can lead to Infertility in Women
Urinary Tract Infections can lead to Infertility in Women

मुंबई: मूत्रप्रणालीमध्ये मूत्रपिंड, मूत्राशय, मूत्रवाहक नलिका आणि मूत्रमार्ग या चार घटकांचा समावेश होतो. मूत्रमार्गातील संसर्गामध्ये यापैकी कोणत्याही भागास संसर्ग होण्याचा संभव असतो. मात्र, मूत्रमार्गाचा संसर्ग हा मूत्राशय आणि मूत्रमार्ग या मूत्रप्रणालीतील खालच्या दोन भागांना जास्त होताना दिसतो. या संसर्गाचे प्रमाण पुरुषांपेक्षा महिलांमध्ये सर्वांत जास्त प्रमाणात आढळून आले आहे. महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा हा दुसऱ्या क्रमांकाचा संसर्ग आहे. 100 पैकी 80 टक्के महिला मूत्रमार्गाच्या संसर्गाने त्रस्त असतात. 20-40 वर्षे वयोगटातील 25-30 टक्के स्त्रियांना हा त्रास असतो.

रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, रक्तातील शर्करा, मूत्रमार्गातील कोरडेपणा, मूत्रमार्गात अडथळे येणे आदी कारणांमुळे आपल्याला मूत्रमार्गाच्या जंतुसंसर्ग होऊ शकतो. शौचाला गेल्यानंतर अथवा लघवीला जाऊन आल्यावर तेथील भाग स्वच्छ करताना नेहमी हात पुढून मागे नेणे आवश्यक आहे. 

नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी क्लिनिकल डायरेक्टर : 

डॉ. सुलभा अरोरा यांनी सांगितले की, चुकीच्या पद्धतीने केलेल्या स्वच्छतेमुळे योनीमार्गात जंतू जाऊन संसर्ग होण्याची शक्यता असते. योनीमार्गातील त्वचा दमट राहू नये यासाठी प्रयत्न करा, कारण अशा ओलसर भागावर विषाणू, जिवाणू किंवा बुरशी सहज वाढतात. वारंवार होणा-या संसर्गामुळे मूत्रपिंडांव्यतिरिक्त फेलोपियन ट्युब आणि गर्भाशयावर परिणाम होऊ शकतो आणि त्याद्वारे वंध्यत्वाचा धोका वाढू शकतो.

संसर्ग टाळण्यासाठी 'हे'करा ! 

तीव्र मूत्रपिंडाचा रोग आरोग्यावर आणि स्त्रीबिजांचा प्रक्रियेवरही परिणाम ठरु शकतो आणि गर्भवती होण्याची शक्यता कमी होऊ शकते. मूत्रसंसर्गाकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांना भेट दिली पाहिजे आणि तसेच वंध्यत्वाबद्दल देखील चर्चा केली पाहिजे. संक्रमण टाळण्यासाठी सार्वजनिक शौचालयाचा वापर करणे टाळले पाहिजे. आपल्या योनीमार्गाची स्वच्छता राखा या संवेदनशील भागाची स्वच्छता करण्यासाठी रासायनिक उत्पादने वापरणे टाळा.

तुमच्या योनी मार्गाला त्रास होईल अशी कोणतीही वस्तू वापरू नका. रसायनिक उत्पादनांबरोबरच स्प्रे आणि पावडरचा देखील वापर करू नका. योनीमार्ग स्वच्छ ठेवण्यासाठी पावडर किंवा रासायनिक द्रव्य असलेला साबण वापरत असाल तर काळजीपूर्वक वापर  करा. ही पावडर किंवा साबण योनीमार्गात जाणार नाही याची काळजी घ्या. यामुळे येथील त्वचा कोरडी पडते आणि संसर्ग होतो. या भागाच्या अचूक स्वच्छतेमुळे आपण जीवाणूंना नष्ट करू शकता. सूती कपड्याचा वापर करा. 

शरीरातून टॉक्सीन बाहेर टाकण्यासाठी भरपूर पाणी प्यावे लागेल. हे आपल्याला ओटीपोटात वेदना आणि सूज यांसारख्या समस्येवर मात करण्यास देखील मदत करेल. क्रॅनबेरीचा ज्युस प्यायल्याने देखील मूत्रमार्गाच्या समस्येशी सामना करण्यास मदत होते. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे वेळेवर घेणे आवश्यक आहे. स्वतःच्या मर्जीने औषधोपचार करु नका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com