व्यायामावेळी मास्क वापरणे फुफ्फुसांसाठी धोकादायक नाही, संशोधनात सिद्ध

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 19 November 2020

मागील काही महिन्यांपासून मास्क वापरणे, सोशल डिस्टंन्स पाळणे आणि हात स्वच्छ सॅनिटाइज करणे हे प्रत्येकासाठी नित्याचेच झाले आहे

कॅलिफोर्निया: मागील काही महिन्यांपासून मास्क वापरणे, सोशल डिस्टंन्स पाळणे आणि हात स्वच्छ सॅनिटाइज करणे हे प्रत्येकासाठी नित्याचेच झाले आहे. या लॉकडाउनच्या काळात बऱ्याच जणांना इच्छा नसतानाही मास्क घालावे लागले, काही काळानंतर मास्क घालणे प्रत्येकाला स्विकारावं लागलं. 

सुरुवातीला बरेच जण शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण घटते म्हणून मास्क कमी प्रमाणात घालायचे. पण आता व्यायाम करताना श्वसनाचे प्रत्यक्ष काम किंवा ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडच्या प्रवाहात मास्कने फारसा बदल होत नसल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

मास्कमुळे निर्माण झालेल्या शारीरिक अडथळ्यामुळे श्वास घेणे कठीण होऊन cardiopulmonary system वर प्रभाव पडू शकतो. त्यामुळे Dyspnea ची लक्षणे दिसू शकतात.

Dyspnea हा एक वैद्यकीय शब्द आहे ज्यामध्ये श्वसनाचा अभाव किंवा श्वसनाचा त्रास होतो. विशेषतः शारीरिक हालचालींदरम्यान Dyspnea असतो. 

अॅनल्स ऑफ द अमेरिकन थोरासिक सोसायटी या नियतकालिकात प्रकाशित करण्यात आलेल्या एका नवीन अभ्यासात संशोधन गटाने असा निष्कर्ष काढला की डिस्प्नियाच्या संवेदना वाढू शकतात, पण मास्क घातल्याने फुफ्फुसांचे कार्य लक्षणीयरीत्या कमी होते याचा कोणताही पुरावा नसल्याचे सांगितले आहे.

कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधन लेखिका सुझन हॉपकिन्स यांनी सांगितले की, मास्क घालण्याचे श्वसनयंत्रनेवरील दुष्परिणाम, रक्तातील ऑक्सिजन आणि CO2 सारख्या वायूंव होणारे परिणाम खूपच लहान असतात, बहुतेकवेळा ते सापडतही नाहीत."

या अभ्यासांमध्ये अनेक घटकांचा पडताळून त्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासात श्वसनाचे कार्य, धमनी रक्तवायू, स्नायूंच्या रक्तप्रवाहावर आणि थकव्यावर होणारे परिणाम, हृदयाचे कार्य आणि मेंदूला रक्तप्रवाह अशा अनेक घटकांचे मूल्यमापन करण्यात आले.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: use of mask during exercise does not affect on lungs

Tags
टॉपिकस
Topic Tags: