
औरंगाबाद : सुंदर आणि चांगले केस सर्वांना आवडतात. आपल्या चांगल्या व्यक्तिमत्त्वात केस महत्त्वाची भूमिक निभावतात. चांगले आणि सुंदर केसांसाठी हे काही पदार्थ टाळा..
1. सिगारेट, दारु : दारु आणि सिगारेटने प्रोटिन सिंथेसिस खूप प्रभावित होतात. याने तुमचे केस पातळ आणि कमजोर होऊ शकतात. सिगारेट आणि दारु आरोग्यबरोबरच केसांचा शत्रू आहे. सिगारेटमधील टाॅक्सिन तुमचे केसांमधील हार्मोनही नष्ट करु शकते. याने केसांची वाढ खुंटते. दारुमुळे तुमचे केसा वेळेच्या पूर्वीच पांढरे होतील.
2. मिठाई आणि साखर : साखर खाल्ल्याने तुम्ही तुमच्या शरीरात इन्सुलिनचे प्रमाण वाढवत आहात. जे तुमचे केस डोक्यापासून दूर करतात. तसेच ते हार्मोन एंड्रोजनचे उत्पादनही करते. यामुळे तुमचे हेअर फाॅलिकल्सही आकुंचन पावतात आणि हे केस गळण्याचे कारण होते.
3. तेलकट पदार्थ टाळा : केस गळत असून ही तुम्ही तेलकट पदार्थ खातच असाल. याचा तुमच्या केसांना फटका बसू शकतो. कारण, तेलकट पदार्थ खाल्ल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो. तसेच पोटात आग आग होते. याने केस तुटू शकतात.
4. आईस्क्रिम : आईस्क्रिममध्ये असलेले उच्च प्रतीचे साखर तुमच्या केसांसाठी धोकादायक ठरु शकते. कारण ते तुमच्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडून टाकते. याने केस गळतीचे प्रमाण वाढण्याची शक्यता वाढते.
केस गळत असतील तर काय खावे?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.