विपशन्येतून ध्यानधारणेचा अनुभव...

वसुंधरा तलवारे
Tuesday, 5 January 2021

तुम्ही कधी आयुष्यात करायच्या गोष्टींची यादी पाहून दडपून जाता का? इतरांना आनंदी करण्यासाठीची यादी तुमच्यावर दबाव आणते का? आणि तुम्हाला स्वत-कडून असलेल्या या अपेक्षांमुळे तुम्ही नैराश्यात जाता का?

प्रश्‍न - ध्यानधारणा आणि योगाची तुमच्या आयुष्यात काय भूमिका असते... तुमचे आयुष्याबद्दलचे अनुभव काय आहेत... तुम्ही या अनुभवांतून लोकांना काय सांगाल?
उत्तर - ध्यानधारणा हे आयुष्यातील सर्वांत उत्तम व सात्त्विक माध्यम आहे. तुम्हाला शरीरातील विष बाहेर टाकणाऱ्या (इनटॉक्सिकंट) एकच एक घटकाचा अनुभव घ्यायचा असल्यास ती ‘ध्यानधारणा’ आहे! त्यातून मिळणारा शांततेचा व मन-शांतीचा अनुभव अमूल्य असतो. आत्मा, मन आणि अंत-करणाच्या मिलाफाचा आत्मानुभव म्हणजे योगा, तुमच्यासोबत येणारा योगा...

तुम्ही कधी आयुष्यात करायच्या गोष्टींची यादी पाहून दडपून जाता का? इतरांना आनंदी करण्यासाठीची यादी तुमच्यावर दबाव आणते का? आणि तुम्हाला स्वत-कडून असलेल्या या अपेक्षांमुळे तुम्ही नैराश्यात जाता का? तुम्हाला हा ताण, अस्वस्थता, असुरक्षितता, लोभ, भीती, निद्रानाश यांचा सामना करावा लागतो का?

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या प्रश्‍नांची उत्तरे ‘हो’ असल्यास हीच वेळ आहे त्यांच्या उत्तरांसाठी स्वत-च्या आतमध्ये पाहण्याची. तुम्ही जगाचे दोष पाहण्यासाठी वापरत असलेली भिंग तुमच्या आतमध्ये डोकावून पाहण्यासाठी वापरण्याची, खोटेपणा आणि भ्रम सोडून दैवी शक्यता जोखून पाहण्याची... आपल्यामध्ये सर्वोत्कृष्ट होण्यासाठीच्या सर्व शक्यता आहेत व त्यासाठी जगातील सर्वोत्कृष्ट देणग्याही मिळाल्या आहेत; मात्र यासाठी आपण आतून स्वत-ला स्वच्छ करायला हवे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पाणी घाण, चिखल व बुरशीने भरलेले असल्यास आपल्याला त्याचा तळ पाहता येत नाही. त्याप्रमाणे आपले मन ताण, नैराश्य, भीती यांनी भरलेले असल्यास आपल्याला सत्य, योग्य आणि चांगल्याचे आकलन होणार नाही. पाणी शांत असताना, त्यातील अनावश्यक घटक काढून घेतलेले असताना त्याच्या तळाशी काय आहे पाहता येते. त्याचप्रमाणे आपणही आपल्या आयुष्यातील स्पष्ट व स्वच्छ धोरण कायम ठेवण्यासाठी मन दररोज स्वच्छ ठेवले पाहिजे. हे महिन्यातून एकदा ‘फेशिअल’ करण्यासारखे नसून, दररोज करण्याची क्रिया आहे. मी गेल्या १३ वर्षांपासून योगा जीवनपद्धती अवलंबते आहे. यामध्ये शरीराला केवळ फॅन्सी पद्धतीने ताणणे नसून, त्यामध्ये खाणे, झोप, चालणे, बोलणे, विचार करणे, स्वत-ला नियोजनबद्ध ठेवणे, याचाही समावेश आहे. अशाप्रकारे जगण्याची सवय लावल्याने इतर सर्व गोष्टी मला निष्कारण आणि भ्रामक वाटतात. मी ध्यानधारणेचा प्रत्येक मार्ग चोखाळला आहे. ‘विपश्यना’ या प्रकारात मला ध्यानधारणेचा सर्वोत्तम पर्याय सापडला व आता माझा शोध संपला असून, अंतर्मनाच्या शुद्धीचा माझा प्रवास सुरू झाला आहे....

(लेखिका योगिनी, लाइफ कोच व इंटरनॅशनल स्पीकर आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vasundhara talware write article experience of meditation

Tags
टॉपिकस
Topic Tags: