योगा लाइफस्टाईल : ऊर्जादायी सूर्यनमस्कार

सूर्यनमस्कार म्हणजे संपूर्ण शरीराच्या आंतरिक बळकटीकरणासाठी, तसेच आरोग्याच्या निरोगीपणासाठी सर्वांग सुंदर व्यायामप्रकार आहे.
Vasundhara Talware
Vasundhara TalwareSakal

सूर्यनमस्कार म्हणजे संपूर्ण शरीराच्या आंतरिक बळकटीकरणासाठी, तसेच आरोग्याच्या निरोगीपणासाठी सर्वांग सुंदर व्यायामप्रकार आहे. अत्यंत परिपूर्ण असलेली ही साधना असून त्यामध्ये आसनांबरोबर प्राणायाम, मंत्र आणि ध्यानाच्या गोष्टी अंतर्भूत आहेत. सूर्यनमस्कार वैदिक परंपरेपासून चालत आलेले असले तरी पारंपरिक हट योगाचा भाग नाही. मूळ आसन प्रकारात सध्याचा व्यग्रतेचा काळ लक्षात घेता त्याचा समावेश केला. सूर्यनमस्कार आपल्या शरीरातील ऊर्जा प्रज्वलित करण्याचे काम करतात. शरीरातील डावी आणि उजव्या बाजूकडील ऊर्जेच्या वाहिन्या संतुलित करत मन एकाग्र करण्यासाठी सूर्यनमस्कार प्रभावीपणे उपयोगी ठरतात.

स्थिर व तालबद्ध पद्धतीने सूर्यनमस्कार घातल्यास त्याचा दिवसभरासाठी ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी फायदा होतो. सूर्यनमस्कार हे केवळ एक आसन नसून, बारा आसन प्रकारांचा तो समुच्चय आहे. त्यापैकी आठ स्वतंत्र आसने असून, चार आसनांची पुनरावृत्ती आहे. योग्य क्रमाने सूर्यनमस्कार केल्यास योग्य ताणाद्वारे शरीराला त्याचबरोबर सांधे आणि स्नायूंना व अंतर्गत अवयवांना मसाज होतो. आपल्याकडे अध्यात्माचे प्रतीक म्हणून सूर्याकडे पाहिले जाते, त्यामुळे पुरातनकाळापासून दररोज त्याची पूजा केली जाते. योगामध्ये सूर्याला जीवनाला शक्ती देणारी पिंगळा किंवा सूर्य नाडी म्हणून ओळखले जाते. आरोग्यदायी आणि चैतन्यपूर्ण जीवनासाठी बहुआयामी असलेले सूर्यनमस्कार सर्वांत उपयोगी ठरतात. त्यातून आध्यात्मिक प्रबोधनाबरोबर जागरूकताही निर्माण होते.

फायदे

  • नित्यनेमाने सूर्यनमस्कार घातल्यास पिंगळा नाडी योग्यप्रकारे कार्यान्वित राहते. त्याद्वारे मानसिक आणि शारीरिक ऊर्जेचे चांगल्या पद्धतीने संतुलन राखले जाते.

  • शरीरातील हार्मोन्सचे संतुलन होते.

  • मानसिक शांतीत वाढ होते.

  • एकाग्रता वाढते

  • चैतन्य आणि ऊर्जेत वाढ होते.

  • आध्यात्मिक शक्तीमध्ये वाढ होण्यास मदत

  • शारीरिक शक्ती पुन्हा मिळते

  • चयापचन क्रिया सुधारते

  • रक्ताभिसरण, पचन, श्वसन, पुनरुत्पादन आदी शरीराच्यासर्व यंत्रणांना संतुलित करत त्यांची ताकद वाढवते.

  • बालपण ते टीनएजर या वाढीच्या वयोगटातील मुलांसाठी उपयुक्त

  • शरीरातील ऊर्जा वाढवते.

शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असणाऱ्या सूर्यनमस्काराच्या प्रत्येक आसनाची आपण पुढील भागात माहिती घेऊ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com