योगा लाइफस्टाइल : श्रेय आणि प्रेय

वसुंधरा तलवारे
Tuesday, 19 January 2021

आपल्याला भोवतालच्या जगात आणि एकूणच विश्वात समतोल आणायचा असल्यास सुरुवात स्वतःपासूनच करायला हवी. तुम्ही हेही मान्य कराल, की सकारात्मक आणि एकाग्र विचार नकारात्मक आणि गोंधळलेल्या विचारांपेक्षा खूपच शक्तिशाली असतात. आजच्या काळात अनेक कारणांमुळे आपण अनागोंदी आणि गोंधळाच्या वातावरणात जगत आहोत.

आपल्याला भोवतालच्या जगात आणि एकूणच विश्वात समतोल आणायचा असल्यास सुरुवात स्वतःपासूनच करायला हवी. तुम्ही हेही मान्य कराल, की सकारात्मक आणि एकाग्र विचार नकारात्मक आणि गोंधळलेल्या विचारांपेक्षा खूपच शक्तिशाली असतात. आजच्या काळात अनेक कारणांमुळे आपण अनागोंदी आणि गोंधळाच्या वातावरणात जगत आहोत. येथे आपले मन पूर्वेच्या दिशेला असते, तर हृदय पश्चिमेला. आणि आपला आत्मा या दोन्हीच्या मध्ये कोठेतरी अडकलेला असतो. कोणतेही बाह्य उपाय आणि तंत्रे यामध्ये समतोल आणू शकत नाही किंवा आपल्या व्यक्तीमत्त्वामध्ये प्रवेश मिळवू शकत नाही. तुम्ही अतिश्रीमंत आहात, मात्र तुमच्या मनात वायफळ विचार आणि शरीरात दूषित घटक असल्यास तुमचे विचार आणि व्यक्तिमत्त्व कोणताही प्रभाव पाडू शकणार नाही. कोणतेही मद्य, अमली पदार्थ तुम्हाला तुमच्या मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक ऱ्हासापासून वाचवू शकणार नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भौतिक सुखांच्या चक्रात...
आपल्या आजूबाजूला असलेल्या, आपल्याला मोहात अडकवणाऱ्या गोष्टींमुळे आपण कायमच पंचेंद्रियांना खूष करण्यात बुडून गेलेले असतो. कितीही मिळाले, तरी आपल्याला कमीच वाटते. आपण आपल्या इंद्रियांचे व त्यांना समाधानी करणाऱ्या भौतिक वस्तूंचे गुलाम झालो आहोत. इतके की, आपण अनेकदा ‘श्रेय’ काय आणि ‘प्रेय’ काय हेच विसरून जातो. प्रेय म्हणजे आपल्या इंद्रियांना जे सुखकर वाटते, जसे विकएण्डला रात्रभर नेटफ्लिक्सवर काहीतरी पाहात बसणे किंवा तुमचे आवडते पदार्थ रात्री उशिरापर्यंत खात बसणे, तुमचे आवडते मद्य रिचवणे किंवा धूम्रपान करणे आदी. हे सर्व तुम्हाला खूप आवडते, तुम्ही त्याचा पुरेपूर आनंद लुटता. मात्र, हे श्रेय आहे का? उशिरा उठण्यामुळे तुम्हाला बरेही वाटत असले, मात्र त्याने तुमचा काही फायदा होतो का? तुमच्या शरीराकडे दुर्लक्ष करणे, व्यायाम न करणे किंवा योगासनांचा सराव न करणे कोणत्याही अप्रशिक्षित मनाला सुखावहच वाटेल. मात्र, भविष्याचा विचार केल्यास हे श्रेय आहे का?  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शरीरातील सुसंवाद
येथेच आपला पूर्वापार चालत आलेला योगासनांचा सराव कामाला येतो. ते आपल्या शरीर, मन आणि आत्म्यात अंतर्बाह्य सुसंवाद, समतोल, शुद्धता, ताकद घेऊन येते. तुम्ही आयुष्यात येणाऱ्या अप्रिय घटनांना खंबीर मनाने सामोरे जाऊ शकता, याप्रसंगी योग्य निर्णय घेऊ शकता, सर्वोत्तम पर्याय निवडू शकता. या निर्णय आणि पर्यायांची अंमलबजावणी करण्यासाठी तुमचे सुदृढ शरीर कामाला येते. अशाप्रकारे आनंदी आत्माच मन आणि शरीरामध्ये सुसंवाद साधून निर्माण झालेल्या शांततेचा आस्वाद घेऊ शकते...
(लेखिका योगिनी, लाइफ कोच व इंटरनॅशनल स्पीकर आहेत.)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vasundhara Talware writes about yoga lifestyle