esakal | योगा लाईफस्टाईल : विज्ञानमय कोषाबद्दल...
sakal

बोलून बातमी शोधा

Yoga

योगा लाईफस्टाईल : विज्ञानमय कोषाबद्दल...

sakal_logo
By
वसुंधरा तलवारे

आपण मागील काही भागांपासून कोषाबद्दलची माहिती घेत आहोत. मनोमय कोषाबद्दल विस्ताराने पाहिल्यानंतर आज आपण विज्ञानमय कोषाची माहिती घेणार आहोत.

विज्ञानमय कोष हा ज्ञानाचा थर आहे, त्याच्यामध्ये केवळ बुद्धीचाच नव्हे, अंतर्ज्ञान आणि आकलनशक्तीचाही समावेश होतो. हा कोष विचार करणे, भावभावना व्यक्त करणे यांच्याशी संबंधित आहे. हा आपल्या मनाच्या अनेकविध पैलूंपेकी एक अत्यंत सूक्ष्म पैलू असून, तो तुमच्या आत्माच्या जाणिवांच्या तेजाचे प्रकटीकरण करीत असतो. तो तर्क, समज, समजून घेणे आणि निर्णयक्षमता या तुमच्या मनातील गोष्टींना जबाबदार असतो. हा कोष अत्यंत सूक्ष्म असल्याने तो बुद्धी, मनाचे शहाणपणाचे व आपल्या हिंस्र भावांतील मला अपेक्षित असलेला फरकही दाखवू शकतो. विज्ञानमय कोष हा तुमच्या मनाचा साक्षीदार असतो किंवा तो आपण काय करतो आहोत किंवा काय विचार करतो आहोत याच्याशी संबंधित नसतो, तर तो आपण काय करतो आहोत आणि काय विचार करतो आहोत, याची ‘जाणीव’ असते. थोडक्यात सांगायचे, तर विज्ञानमय कोष जाणिवांशी, जागरूकतेची संबंधित आहे. जेव्हा तुम्हाला परिपूर्णतेचे वेड नसते, भविष्याबद्दल फारशी काळजी नसते, तुम्ही कसे दिसता, वागता याबद्दल लोक काय विचार करतात याचा विचार तुम्ही करीत नाही, तेव्हाच तुमच्या ‘जाणिवा’ स्पष्ट असतात. तुम्हाला तुमच्या आतमध्ये काय चालले आहे, हे जाणवते आणि तुमचे मन तुम्ही जे आहे त्यात समाधानी राहते, त्यातील बारकावे तुम्हाला समजतात. ही जाणीव तुमचा विज्ञानमय कोष पूर्ण विकसित झाल्यावरच निर्माण होते.

तुमच्यातील स्थिरतेचा पाया

विज्ञानमय कोषाचा तोल मनोमय कोषावर धरला गेलेला असतो, त्याच्या स्थिरतेचा पाया तेथेच असतो. तुमचा मनोमय कोष स्थिर असल्यासच विज्ञानमय कोषातील प्रगती तुम्हाला अनुभवता येते. विचारांचे रूपांतर भावनांमध्ये होते! हे तुम्ही याआधी ऐकले आहे का? सुंदर मनोमयातूनच तुम्ही स्वर्गीय विज्ञानमयतेचा आनंद घेऊ शकता. तुम्ही सर्वप्रथम तुमच्यावर अत्याचार करणाऱ्या विचारांतून स्वतःला बाहेर आणले पाहिजे, तुमच्या दुःखाच्या सागरातून वेगाने पुढे नेले पाहिजे. या तुम्हाला तुमच्या स्वत्वापासून दूर नेणाऱ्या लाटांना भेदत तुम्ही वर आले पाहिजे. असे केल्यास आपण एक पाऊल मागे येतो आणि स्वतःकडे काही अंतरावरून पाहू शकतो. येथेच तुम्हाला खऱ्या अर्थाने अंतर्ज्ञान प्राप्त होते. ध्यानधारणा ही या कोषाची खरी ओळख आहे.

loading image