esakal | योगा लाइफस्टाईल : हस्तउत्थानासन
sakal

बोलून बातमी शोधा

Vasundhara Talware

योगा लाइफस्टाईल : हस्तउत्थानासन

sakal_logo
By
वसुंधरा तलवारे

सूर्यनमस्कारांच्या आसन साखळीतील हस्तउत्थानासन हे दुसऱ्या क्रमांकाचे आसन आहे. संस्कृतमधील हस्त या शब्दाला मराठीत हात आणि उत्थान म्हणजे वर उचलणे असे म्हणतात. सूर्यनमस्काराचा भाग म्हणून दुसऱ्या स्थितीतील हे आसन करताना आपण ‘ओम रवेयनः महा’ हा मंत्र म्हणू शकतो. प्रकाश देणाऱ्या सूर्याला नमस्कार असा या मंत्राचा अर्थ आहे. आसनाच्या अकराव्या स्थितीतील ‘ओम अर्काय नमः’ हा मंत्राचा उच्चार आपण करू शकतो. स्तुती करण्यायोग्य असलेल्यास प्रणाम असा या मंत्राचा अर्थ आहे.

हे आसन कसे करायचे?

  • छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे आणि मागच्या लेखात उल्लेख केल्यानुसार दोन्ही पाय जवळ घेऊन उभे राहावे.

  • प्रणामासनाच्या स्थितीत म्हणजे दोन्ही हात छातीजवळ नमस्कार मुद्रेत घेऊन उभे राहिल्यानंतर श्वास घ्या. दोन्ही हात ताणून घेत नमस्कार अवस्थेतच डोक्याजवळून वरच्या बाजूला न्यावेत.

  • थोडा सराव झाल्यावर डोके आणि ताणलेला भाग काही प्रमाणात मागच्या बाजूला न्या. ते शक्य नसल्यास ताठ उभे रहावे. हनुवटी जमिनीला समांतर ठेवा. हृदयाबाबत काही त्रास असल्यास मागच्या बाजूला झुकणे टाळा.

  • सूर्यनमस्काराच्या आसन प्रकारातील साखळीशिवाय हे स्वतंत्र म्हणून आसन करू शकता. ते करताना आसनाची स्थिती घेतल्यावर श्वास शांतपणे आत घ्या आणि सोडा. साधारण एक मिनिटांपर्यंत ही आसनस्थिती असावी.

आसनाचे फायदे

  • पचनाची समस्या कमी करण्यासाठीचा सोपा आसनप्रकार

  • ओटीपोटाचे स्नायू ताणले जाऊन मजबूत होतात.

  • छाती आणि बरगड्यांमध्ये पूर्ण क्षमतेने श्वास भरला जातो. त्यामुळे फुफ्फुसांना ऑक्सिजनचा चांगला पुरवठा होऊन त्याची कार्यक्षमता वाढते.

loading image