योगा लाइफस्टाइल : अथ योगानुशासनम्

लेखकाने ‘अथ’ शब्दाचा वापर का केला, हे जाणून घेणे मोठे गमतीशीर आहे. तो अत्र योगनुषसनम् हा शब्दही वापरू शकला असता. त्याचा याठिकाणीही अर्थ योगाची शिस्त असाच आहे.
Vasundhara Talware
Vasundhara TalwareSakal

१) अथ - आता

२) योगा - तुम्ही माझ्या मागील लेखांतून योगाबद्दल अत्यंत तपशीलवार माहिती वाचली असेलच. थोडक्यात काय, तर संस्कृतमध्ये याला एकरूप होणे म्हणतात. तुमच्यातील आत्म्याचे परमात्म्याशी एकरूप होणे म्हणजेच योगा होय. पतंजली यांच्या म्हणण्यानुसार योगा म्हणजे समाधी.

३) अनुशासन - शिस्त, नियम किंवा सूचनांचे पालन

आता योगातील शिस्तीबद्दल माहिती घेऊयात

लेखकाने ‘अथ’ शब्दाचा वापर का केला, हे जाणून घेणे मोठे गमतीशीर आहे. तो अत्र योगनुषसनम् हा शब्दही वापरू शकला असता. त्याचा याठिकाणीही अर्थ योगाची शिस्त असाच आहे. परंतु अथ म्हणजे योगामधील काही सूचना या मागील सूचनांशी संबंधित आहेत.

अर्थात, तो व्याकरणावरील (सूत्राचा) त्याच्या मागील कार्याचा संदर्भ देत असेल. आयुर्वेदाचा व्याकरण म्हणून विचार केल्यास स्पष्टोक्ती आणि ठोस आकलनाची गरज असल्याचे जाणवते, त्याचबरोबर शारीरिक स्वच्छता आणि आंतरिक समतोलासाठी आयुर्वेदिक औषधे महत्त्वाची असतात. त्याचा योग सूत्राशी संबंध आल्यास दोन्ही मिळून एकत्रितरीत्या मोक्षशास्त्र (आध्यात्मिक विज्ञान) म्हणून ओळखली जातात. याचा आणखी एक विचार म्हणजे शारीरिक आणि मानसिक बंधनाच्या माध्यमातून माणसाच्या उत्क्रांतीचा शोध लावणारा हा विषय आहे.

कर्माद्वारे स्वतःला शुद्ध केल्यानंतर अथ या शब्द वापरला जाऊ शकतो. योग आणि भक्ती योगाने मानसिक प्रवृत्ती एकत्र केल्यानंतर संबंधितांना योगा संदर्भात योग्य सूचना दिल्या जाऊ शकतात. या मार्गाचा आणखी एक अर्थ आहे. अंतःकरण शुद्ध आहे, मन शांत आहे त्यांच्याचसाठी या योगसूत्रांतील सूचनांचा उपयोग होऊ शकतो, अन्यथा काहीही फायदा होत नाही. अपवित्र मन, डगमगण्याची प्रवृत्ती आहे अशा व्यक्ती या शास्त्रात सांगितलेल्या नियमांचा सराव करू शकत नाहीत. त्यामुळेच कर्म योग, भक्ती योग आणि अन्य तयारी पद्धतींसाठी स्वतःला पात्र बनविण्याच्या गरजेवर जोर देण्यासाठी अथ या शब्दाचा वापर केला आहे.

योगा म्हणजे एकरूप होणे. याबाबत पुढील सूत्रात अधिक तपशीलवार माहिती घेऊयात.

अनुशासनम् हा दोन शब्दांची संधी आहे. शासन म्हणजे आदेशाचे, सूचनांचे किंवा नियमांचे पालन करणे आणि अनुचा उपयोग शासनाच्या पूर्णत्वावर जोर देण्यासाठी उपसर्ग म्हणून केला जातो. शासनाशिवायचे जग म्हणजे अराजकतेचे ठिकाण. समजा कोणतेच नियम नसल्यास रस्त्यांवर वाहनांचे, अवकाशात विमानांचे अपघात होतील, हंगामी फळांबरोबर निश्चित पाऊस नसणे, वैयक्तिक गुणधर्म, मर्यादा, सीमा नसतील. म्हणूनच अराजकता निर्माण होऊ नये, जगात जीवन सुरळीत राहण्यासाठी नियमांची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे स्वशिस्तीशिवाय योगाभ्यास सुरू होऊ शकत नाही.

काही दिवसांपूर्वी मी मंत्रमुग्ध करणाऱ्या काबिनी जंगलात गेले होते. त्याठिकाणी तलावाजवळील एका झोपडीत पाच दिवस राहिले. मला दिवसा पाण्याकडे आणि रात्री ताऱ्यांकडे टक लावून बघायचे होते, परंतु यासाठी इंद्रियांना काय हवे आणि आत्मा काय मागतो यामध्ये एकप्रकारचे संतुलन असणे आवश्यक होते. असा एकही दिवस नव्हता जिथे मी माझ्या आत्म्याला आध्यात्मिक पद्धतीने जोपासले नाही. त्याचा परिणाम असा झाला, जंगलातील अदभूत पक्ष्यांचे अगदी बारीक आवाज शांतपणे ऐकू शकले. तलावातील चमचमणाऱ्या पाण्याची निळाई अनुभवता आली. त्याचबरोबर तेथील कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण केले. देशभरातून नवीन मित्र बनविले. कोणतीही गडबड न करता प्रवास केला. मला गरज होती तेव्हा हवे ते मिळविले. शिस्तीची ही अशी जादू आहे. जग तुमच्या पाया पडते आणि अनेक गोष्टी सहजतेने, सौहार्दाने मिळतात. योग जीवन तुमच्यासाठी हेच करते. अर्थात यातील पहिली पायरी म्हणजे योगाच्या शिस्तीचे पालन करणे, ही होय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com