हेल्थ वेल्थ : साखरेबद्दल बोलू या... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sugar

साखर अनेक वर्षांपासून पोषणाशी निगडित विषयांच्या चर्चेत आहे. लोक आरोग्याबाबत अधिक जागरूक होत असताना, आपल्यासाठी किती साखर हानिकारक आहे आणि आपण किती खाणे आवश्यक आहे.

हेल्थ वेल्थ : साखरेबद्दल बोलू या...

- विकास सिंह, संस्थापक, ‘फिटपेज’ ॲप

साखर अनेक वर्षांपासून पोषणाशी निगडित विषयांच्या चर्चेत आहे. लोक आरोग्याबाबत अधिक जागरूक होत असताना, आपल्यासाठी किती साखर हानिकारक आहे आणि आपण किती खाणे आवश्यक आहे याबद्दल बरीच योग्य व तितकीच चुकीची माहिती देखील उपलब्ध आहे. मात्र, साखरेचे आरोग्यावर होणारे परिणाम समजून घेण्यापूर्वी साखर म्हणजे नेमके काय ते समजून घेऊया.

साखर म्हणजे काय?

साखर हे मुळात एक साधे कार्बोहायड्रेट आहे, जे नैसर्गिकरीत्या अनेक पदार्थांमध्ये आढळते किंवा आपण वापरत असलेले अन्न आणि पेये गोड करण्यासाठी तिचा वापर केला जातो. आपण साधारणपणे २ प्रकारच्या साखर वापरतो.

पांढरी साखर : ही साधारणपणे ऊस आणि बीटरूटमधून काढली जाते आणि आपण खातो त्या अन्नामध्ये किंवा प्रक्रिया केलेले अन्न आणि पेये यामध्ये तिचा वापर होतो.

नैसर्गिक साखर : ही साखर फळे, दुग्धजन्य पदार्थ आणि काही भाज्यांमध्ये आढळते.

कोणती साखर योग्य?

काही लोक असे मानतात, की नैसर्गिक साखर खाणे हे पांढऱ्या साखरेपेक्षा कमी हानिकारक आहे. मात्र, आपले शरीर दोन्ही प्रकारच्या साखरेवर सारखीच प्रतिक्रिया करते. मात्र, शरीराद्वारे शोषले जाण्याची पद्धत वेगळी आहे. हे कोलाचे उदाहरण घेऊन समजून घेऊ, ज्यामध्ये पांढरी साखर असते आणि सफरचंदासारखे संपूर्ण फळ ज्यामध्ये नैसर्गिक साखर असते. तुम्ही पीत असलेल्या कोलामध्ये भरपूर साखर असते, ती तुमच्या रक्तप्रवाहावर थेट परिणाम करते आणि इन्शुलिनची पातळी वाढवते. शरीर असे अन्न आणि पेये लवकर पचवते, त्यामुळे त्यांना ऊर्जेचा चांगला स्रोत म्हणता येत नाही. याव्यतिरिक्त, पांढरी साखर कोणत्याही पौष्टिक मूल्यांशिवाय केवळ आपल्या शरीरातील कॅलरीचे प्रमाण वाढवते. तुम्ही संपूर्ण फळ किंवा भाजीपाला खाल्ल्यावर ते तुमच्या रक्तप्रवाहावर थेट परिणाम करत नाही, कारण नैसर्गिक साखर फळे आणि भाज्यांमधून मिळणाऱ्या फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांच्याद्वारे येते. ती रक्तप्रवाहात येण्यापूर्वी मंद पचन प्रक्रियेतून जाते. परिणामी, तुम्हाला पोट भरलेले आणि तृप्त वाटते आणि तुमच्या शरीराला हे कळते की खाणे कधी थांबवायचे.

उदाहरणार्थ, एक ग्लास कोला प्यायल्याने तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटते, की तीन सफरचंद खाल्ल्याने आणि या दोन्हीमध्ये साखरेचे प्रमाण सारखेच आहे का? मला खात्री आहे की तुमच्यापैकी बहुतेकांना एक ग्लास कोलाऐवजी ती सफरचंद खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटेल.

आता तुम्हाला माहीत आहे, की घरातली पांढरी साखर तुमच्या आरोग्यासाठी चांगली नाही. त्याचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो यावर चर्चा करूया. जास्त साखरेचे सेवन केल्याने लठ्ठपणा, कोलेस्टेरॉल, मधुमेह आणि हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित रोगांसारख्या अनेक आरोग्य समस्यांचा धोका वाढतो, जो आरोग्यासाठी चांगला नाही.

साखर किती प्रमाणात घ्यावी?

तुमच्या एकूण कॅलरी सेवनाच्या प्रमाणानुसार मध्यम प्रमाणात साखर खाल्ल्यास ती हानिकारक नसते. सर्वसाधारणपणे, १ ग्रॅम साखरेमधून ४ कॅलरीज मिळतात. अमेरिकन हार्ट असोसिएशन नुसार साखरेचे सेवन तुमच्या एकूण कॅलरी सेवनाच्या ६ टक्क्यांपेक्षा जास्त नसावे.

साखरेचे परिणाम

साखरेच्या अतिसेवनामुळे इन्शुलिनचा प्रतिकार होऊ शकतो. हे तुमचे शरीर इन्शुलिनला चांगला प्रतिसाद देत नाही तेव्हा होते आणि तुमच्या रक्तातील ग्लुकोज ऊर्जेसाठी वापरू शकत नाही. यामुळे ‘टाइप २’ मधुमेहाचा धोका वाढतो. प्रक्रिया केलेले पदार्थ आणि रस हे फ्रुक्टोज आणि स्वीटनर्सने भरलेले असतात, ज्यामुळे तुमची भुकेची पातळी वाढते कारण ते आपल्या शरीरातील भूक नियंत्रित करणारे हार्मोन लेप्टिनचा प्रतिकार करते. यामुळे गरजेपेक्षा जास्त खाणे होऊ शकते आणि परिणामी वजन वाढू शकते. तसेच, जास्त साखरेचा आहार घेतल्याने तुम्हाला सुस्ती येते आणि कामे अधिक संथ गतीने होतात. संशोधनातून असे दिसून आले आहे, की प्रक्रिया केलेले अन्न आणि साखर त्वचेचे वृद्धत्व आणि त्वचेला सुरकुत्या पडण्याच्या क्रियेला गती देतात. साखरेचे सेवन केल्याने दात देखील किडू शकतात, ज्याने दातांमध्ये पोकळ्या निर्माण होऊ शकतात. याचे कारण असे, की तुम्ही साखर खाल्ल्यानंतर तुमच्या तोंडातील बॅक्टेरिया तुमच्या दातांवर प्लॅकचा एक पातळ थर तयार करतात. हा जिवाणू तुम्ही खात असलेल्या अन्न आणि पेयांमधील साखरेबरोबर रिॲक्ट होतो आणि ह्या रिॲक्शनमुळे दातांना हानी पोहोचवणारे आम्ल सोडण्यास चालना मिळते.

Web Title: Vikas Sinh Writes Lets Talk About Sugar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :health newssugar
go to top