हेल्थ वेल्थ : पावसाळा आणि रोगप्रतिकारकता

पावसाळा हा उन्हाळ्यातील उष्णतेपासून सुटका देणारा एक सुखद बदल आहे; पण तो आपल्यासह विविध प्रकारचे आजारही घेऊन येतो.
Rainfall and immunity
Rainfall and immunitysakal
Summary

पावसाळा हा उन्हाळ्यातील उष्णतेपासून सुटका देणारा एक सुखद बदल आहे; पण तो आपल्यासह विविध प्रकारचे आजारही घेऊन येतो.

- विकास सिंह, संस्थापक, ‘फिटपेज’ ॲप

पावसाळा हा उन्हाळ्यातील उष्णतेपासून सुटका देणारा एक सुखद बदल आहे; पण तो आपल्यासह विविध प्रकारचे आजारही घेऊन येतो. आपल्याला पाऊस कितीही आवडत असला, तरी तो तापमानातील बदल, बॅक्टेरिया आणि विषाणूंसह येतो जे आपल्या प्रतिकारशक्तीवर परिणाम करतात ज्याने आपल्याला सर्दी, ताप, फूड पॉइझनिंगसारखे त्रास होतात.

एक पालक म्हणून तुम्हाला तुमचे मूल पावसात बाहेर जाण्याची काळजी वाटू शकते. ज्येष्ठ नागरिकदेखील या दिवसांत घरातच राहणे पसंत करतात; पण हा चिंतेचा विषय का आहे? त्यासाठी मॉन्सूनचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो ते आधी आपण समजून घेऊया.

रोगप्रतिकार प्रणाली महत्त्वाची का आहे?

हवा ही प्रदूषण आणि कार्बन डायऑक्साइडने भरलेली असते. पाऊस पडला की हवेतील हे विषारी घटक खाली येतात. शिवाय, पावसामुळे हवेतील आर्द्रता वाढते, थंडीची परिस्थिती निर्माण होते आणि अशा हवामानात हानिकारक विषाणू आणि जीवाणूंची वेगाने वाढ होते.

अशा परिस्थितींमुळे तुम्ही आजारी पडण्याची शक्यता वाढते. शिवाय, पावसामुळे अस्वच्छतादेखील वाढते- जे मलेरिया आणि डेंग्यूला कारणीभूत असलेल्या डासांचे प्रजनन केंद्र बनतात. अशा परिस्थितीत आपली रोगप्रतिकारक यंत्रणा या आजारांपासून आपला बचाव करण्यासाठी संरक्षणात्मक कवच म्हणून काम करते.

उदाहरणार्थ, तुम्ही पावसात भिजता, तेव्हा तुमच्या शरीराचे तापमान कमी होते आणि तुम्ही थरथर कापायला लागता. WBCs (पांढऱ्या रक्त पेशी) हे आपल्या शरीराचे सैनिक आहेत- जे आपल्याला वेगवेगळ्या रोगांपासून वाचवतात. तुमच्या WBC तुमच्या शरीराचे तापमान पूर्ववत करण्यासाठी आणि थरथर थांबवण्यासाठी संघर्ष करू लागतात.

याव्यतिरिक्त, हवेत बॅक्टेरिया आणि विषाणूंचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीरावर अधिक ताण येतो. तुमच्या शरीराला वेगवेगळ्या ठिकाणांहून प्रवेश करणाऱ्या हानिकारक जीवाणूंशी लढणे कठीण होते. त्यामुळे अशा आजारांना आपण बळी पडू नये यासाठी प्रतिकारशक्ती सांभाळणे महत्त्वाचे आहे. या पावसाळ्यात तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही या काही सोप्या टिप्स पाळू शकता.

  • पावसात भिजणे टाळा आणि भिजलात तरी, हानिकारक बॅक्टेरियांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी आल्यावर गरम पाण्याने आंघोळ करा.

  • अन्नातून पोटात जाणाऱ्या जंतूंपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी कच्च्या अन्नाऐवजी उकडलेले अन्न घ्या. फळे खातानादेखील ती स्वच्छ धुवून घ्या.

  • तळलेले पदार्थ खाण्याऐवजी आवश्यक पोषकद्रव्ये पुरवणाऱ्या भाज्या, सूप आणि खिचडीसारख्या पौष्टिक आणि गरम पदार्थांचा समावेश करा.

  • आल्याचा चहा, हळदीचे दूध (चिमूटभर काळी मिरी पावडरसह), सुकामेवा, बिया आणि विविध प्रकारचे भोपळे यासारखे अन्न खाण्यावर लक्ष केंद्रित करा- जे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतील.

  • पावसाळ्यात सूर्यप्रकाशाची कमतरता असल्याने तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन व्हिटॅमिन डी सप्लिमेंट सुरू करू शकता.

  • दिवसभर कोमट पाणी प्या- कारण ते विविध जीवाणू आणि विषाणू नष्ट करण्यात आणि शरीराचे तापमान उबदार ठेवण्यास मदत करते. दररोज किमान १-२ लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न करा.

  • अस्वच्छ ठिकाणे किंवा रस्त्यावर लावलेल्या गाड्यावरच अन्न खाणे टाळा कारण ते तुम्हाला वेगवेगळ्या संसर्गात अडकवू शकतात.

  • हवेतील हानिकारक विषाणूंशी लढल्यानंतर शरीरावर आलेला ताण घालवण्यासाठी शरीराला पुरेशी झोप द्या.

या मार्गदर्शक तत्त्वांसोबतच तुमच्या शरीराच्या हालचालींची काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे. तुम्ही सक्रिय राहाल याची खबरदारी घ्या- कारण जेव्हा तुम्ही चालता किंवा इतर कोणताही व्यायाम करता, तेव्हा तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह वाढतो, यामुळे तुमच्या संपूर्ण शरीरात रोगप्रतिकारक पेशींचा प्रवाह जलद गतीने होतो.

यामुळे शरीरातील सूज आणि बॅक्टेरियाशी जलद गतीने लढण्यास मदत होते. मला माहिती आहे, की पावसामुळे तुम्ही बाहेर जाऊन फिरू शकत नाही; पण स्वतःला सक्रिय ठेवण्यासाठी तुम्ही इतरही अनेक गोष्टी करू शकता. उदाहरणार्थ..

  • तुमच्या इमारतीच्या किंवा घराच्या पायऱ्या तुम्ही चढू उतरू शकता. एका दिवसात स्वतःसाठी तुम्ही किती पाऊले चालणार आहात याचे एक टार्गेट ठेवा.

  • योगासने, घरातल्या घरात चालणे, तुमच्या कुटुंबीयांसोबत आणि मित्रांसोबत खेळणे यांसारख्या इनडोअर फिटनेस अ‍ॅक्टिव्हिटी सुरू करा. तुमच्या मुलांनादेखील पावसाळ्यात घरी बसावे लागते. अशा वेळी तुम्ही स्वतःला सक्रिय ठेवण्यासाठी त्यांच्यासोबत ‘बॉल थ्रो’सारखे काही शारीरिक खेळदेखील खेळू शकता.

  • पावसाळ्यात बाहेर व्यायाम करणे शक्य नसले, तरी तुम्ही जिम किंवा इतर कोणत्याही फिटनेस सेंटरमध्ये नाव नोंदवू शकता.

तथापि, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे, की सातत्य ही गुरुकिल्ली आहे. रोगांपासून सुरक्षित राहण्यासाठी आणि निरोगी मॉन्सूनसाठी आपल्या दिनचर्येत या गोष्टींचा समावेश करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com