esakal | वजन कमी करायचं आहे ? यावेळेत एक्सरसाइज केल्यास होईल वजन कमी
sakal

बोलून बातमी शोधा

exercise

बहुतेक लोक एक्सरसाइजच्या वेळेबद्दल द्विधा मनस्थितीत असतात. एक्सरसाइज सकाळी की सायंकाळी करू याच विचारात तिचे काही दिवस निघून जातात.

वजन कमी करायचं आहे ? यावेळेत एक्सरसाइज केल्यास होईल वजन कमी

sakal_logo
By
सुस्मिता वडतिले

पुणे : आपल्या आजूबाजूला अशी व्यक्ती असतेच जी नेहमीच म्हणते की, माझं वजन वाढले आहे आणि मला ते कमी करायचे. पण एक्सरसाइज कसे आणि कोणत्या पद्धतीने केल्यावर वजन कमी होईल याचा ती विचार करत असते. एक्सरसाइज सकाळी की सायंकाळी करू याच विचारात तिचे काही दिवस निघून जातात. चला तर मग कोणत्या वेळेत एक्सरसाइज केल्यावर वजन कमी होते ते जाणून घेऊयात. 

बहुतेक लोक एक्सरसाइजच्या वेळेबद्दल द्विधा मनस्थितीत असतात. प्रत्येकांचा एक्सरसाइज करण्याचा एक आवडता वेळ असतो. त्यातच काही लोकांना सकाळी लवकर उठणे शक्य होत नाही. सकाळी काही लोक उठतात, परंतु इतके एक्टिव वाटत नाहीत की ते सकाळी एक्सरसाइज करतील. बरेच लोक सायंकाळी एक्सरसाइज करतात किंवा वॉकिंग करायला जातात. त्याच वेळी काही लोक सकाळी उठून एक्सरसाइज करूनच दिवसाची सुरूवात करतात.

यावेळीच वजनावर परिणाम होतो

फारच थोड्या लोकांना माहिती आहे की, एक्सरसाइजची वेळ देखील वजनावर परिणाम करत असते. 

सकाळी एक्सरसाइज केल्यास

सकाळी एक्सरसाइज करण्यासाठी लवकर उठल्यावर आपल्याला पूर्ण दिवसासाठी भरपूर वेळ मिळतो. सकाळी एक्सरसाइज केल्याने शरीरात एंडॉर्फिन हार्मोन्स तयार होतात. ज्यामुळे तणाव कमी होतो आणि मन शांत राहते. यामुळे पूर्ण दिवस चांगला जातो.

सकाळी एक्सरसाइज करण्याचे फायदे 

मेडिसिन एंड साइंस इन स्पोर्ट्स एंड एक्सरसाइजमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, ज्या महिला सकाळी उठून 45 मिनिटांपर्यंत ब्रिस्क वॉक करतात, त्यांचे लक्ष खाण्यापिण्याकडे कमी जाते. एवढेच नव्हे तर या महिला दिवसभर एक्टिव ही राहतात. 

चांगली झोप येते
 
सकाळी एक्सरसाइज केल्याने मेटाबॉलिज्म देखील चांगले राहते, ज्यामुळे दिवसभर कॅलरी कमी होत राहते. सकाळी एक्सरसाइज करणार्‍यांना सायंकाळच्या  एक्सरसाइजपेक्षा चांगली झोप येते.

सायंकाळी एक्सरसाइज करण्याचे फायदे

हेल्थलाइन रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, दुपारी दोन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत शरीराचे तापमान सर्वाधिक असते. शरीराचे तापमान वाढल्यास स्नायूंना सामर्थ्य मिळते. म्हणजेच आपले शरीर यावेळी व्यायामासाठी सर्वात तयार असून वजन कमी करण्यासाठी त्याचा फायदा होतो.

यामुळे शरीराला होतो फायदा
 
दुपार आणि सायंकाळी हृदय गती आणि रक्तदाब (ब्लड प्रेशर) त्यांच्या खालच्या पातळीवर असतो. यामुळे आरोग्यास हानी होण्याची शक्यता कमी असते आणि एक्सरसाइजचे फायदा ही होतो. झोपेच्या आधी एक्सरसाइज करू नका, अन्यथा आपल्याला झोपेची समस्या उद्भवू शकते.

रुटीन करणे जरुरीचे 

आपण दररोज नियमितपणे एक्सरसाइज करणे हे वेळेपेक्षा अधिक महत्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी नियमित एक्सरसाइज करणे देखील जरुरीचे आहे. हे फिटनेस टिकवून ठेवण्यास, तणाव कमी करण्यास आणि शरीराला अनेक प्रकारे फायदा होण्यास मदत करते.


 
 

loading image
go to top