काय आहे बर्ड फ्लूची लक्षणे? रोगापासून वाचण्यासाठी काय कराल?

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 January 2021

राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि केरळमध्येही बर्ड फ्लूची अनेक प्रकरणे आढळून आली आहेत.

देशात 'बर्ड फ्लू' रोगाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि केरळमध्येही याची अनेक प्रकरणे आढळून आली आहेत. बर्ड फ्लू एवियन इन्फ्लूएंजा (H5N1) याला सामान्य भाषेत बर्ड फ्लू असं म्हटलं जातं. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणखी एका रोगाने हाहाकार माजवू नये म्हणून प्रशासन सतर्क झालं आहे. मात्र, हा बर्ड फ्लू आहे तरी काय? तसेच या आजाराची काय आहेत लक्षणे याविषयीच आपण जाणून घेऊयात...
काय आहे बर्ड फ्लू
हा रोग बर्ड फ्लू नावाने ओळखला जातो. बर्ड फ्लू इन्फेक्शन कोंबड्या, टर्की, गीस आणि बदकांसारख्या प्रजातींमध्ये सर्वाधिक आढळतो. H5N1 बर्ड फ्लू एवियन इन्फ्लूएंजा असं याचं नाव असून हा अत्यंत संसर्गजन्य आहे. वेळेवर उपचार न मिळाल्यास हा जीवघेणा रोग ठरू शकतो.

हेही वाचा - ‘होम ऑफिस’साठी काही टिप्स;घरून काम करताना...​
माणसांपर्यंत कसा पोहोचतो हा रोग
बर्ड फ्लू हा संसर्गजन्य रोग आहे. प्रामुख्याने पक्ष्यांना हा रोग आधी होतो. अशा पक्ष्यांच्या सर्वधिक जवळ राहणाऱ्यांना हा रोग आधी होतो. कोंबडीच्या वेगवेगळ्या प्रजातींच्या थेट संपर्कात राहिल्याने माणसांमध्ये हा विषाणू पसरु शकतो. माणसांमध्ये हा व्हायरस डोळे, तोंड आणि नाकावाटे पसरतो. पक्ष्यांचे दुषित पिंजऱ्यांना स्पर्श केल्याने एका पक्ष्यांकडून दुसऱ्या पक्ष्याकडे हा रोग पसरत जातो.
काय आहेत रोगाची लक्षणे?
हा व्हायरस पक्ष्यांबरोबरच माणसांसाठीही धोकादायक मानला जातो. माणसांमध्ये याची लक्षणे सामान्य असू शकतात.

 • नाक गळणे
 • डोकेदुखी
 • गळ्यात सूज
 • कफ होणे
 • ताप येणे
 • उलटी आल्यासारखे वाटत राहणे
 • वारंवार अतिसार होणे
 • अंगदुखी

बर्ड फ्लू पासून वाचण्यसाठी हे करणे टाळा

 • जिवंत कोंबडी पक्ष्याच्या संपर्कात येऊ नका.
 • मांस शिजवण्यासाठी वापरले जाणारी भांडी वेगळी ठेवा
 • बर्ड फ्लूच्या संसर्गात मांसाहर करणे टाळा
 • संक्रमित भागात जाऊ नका, अथवा मास्क वापरुन जा
 • मांसाहार करायचा असेल तर मांस गरम होऊपर्यंत शिजवलं जाईल याची खात्री करा
 • आपल्या हातांना गरम पाणी आणि साबणाने धुवा
 • कच्ची अंडी खाऊ नका
 • मटण मार्केट अथवा पोल्ट्री फार्ममध्ये जाऊ नका
 • अर्धेकच्चे कोंबड्या वा इतर प्राणी खाऊ नये
   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: what are the symptoms bird flu what precautions we must take