
सद्गुरू
प्रश्न : जे लोक यशस्वी आहेत ते सगळेच बुद्धिमान नाहीत. सगळे बुद्धिमान लोक यशस्वी नाहीत. असे का आहे?
सद्गुरू : सर्वांत प्रथम आपल्याला हे ठरवायला हवे, की यश म्हणजे नेमके काय? तुमच्यासाठी यशाची संकल्पना काय आहे? कदाचित आत्ता सध्या भारतीय मापदंडानुसार, तुम्ही विचार करत असाल, की जर तुमच्याकडे दहा कोटी रुपये असतील, तर तुम्ही खूप यशस्वी आहात. कदाचित दुसरीकडे कुठेतरी दहा कोटी रुपये हे काही मोठे यश नसू शकते. कदाचित तुमच्या पणजोबांकडे फक्त हजार रुपये होते; पण ते तुमच्या गावात किंवा तुमच्या शहरात सर्वांत यशस्वी व्यक्ती होते. आज, प्रत्येक मजुराकडे हजार रुपये आहेत. त्याला यशस्वी मानले जात नाही.