esakal | चिंता वाढवणारी बातमी! कोरोनावर मात केलेल्या लहान मुलांना MIS-C चा धोका
sakal

बोलून बातमी शोधा

Childrens

कोरोनावर मात केलेल्या लहान मुलांना MIS-C चा धोका

sakal_logo
By
शर्वरी जोशी

देशातील प्रत्येक नागरिक सध्या गंभीर परिस्थितीला समोरं जात आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोनाचं संकट सुरु असतांनाच त्यात भर म्हणून म्युकोरमायकोसिस या आजाराने डोकं वर काढलं. त्यामुळे सध्या या दोन आजारांचा सामना करता करता प्रत्येकाची पुरेवाट झाली आहे. यामध्येच आता कोरोनावर मात केलेल्या लहान मुलांमध्ये ‘मल्टी-सिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम’ म्हणजेच MIS-C ही नवीन समस्या निर्माण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत अनेक लहान मुलांमध्ये या आजाराची लक्षण दिसून आली आहेत. (what-is-mis-c-disease-that-became-threat-to-children-who-recovered-from-corona)

आतापर्यंत कोरोनातून बरं झाल्यानंतर म्युकोरमायकोसिस हा आजार होत असल्याचं पाहायला मिळालं होतं. हा आजार खासकरु तरुण आणि वयस्क व्यक्तींमध्ये होत होता. परंतु, आता लहान मुलांवरही हे संकट ओढावलं आहे. कोरोनावर मात केलेल्या लहान मुलांमध्ये MIS-C ची समस्या निर्माण होत असल्याचं समोर आलं आहे.

vaccination-of-children

vaccination-of-children

MIS-C ही सध्याच्या काळात आरोग्यविषयक गंभीर स्थिती असून कोविडवर मात केलेल्या मुलांमध्ये हा आजार आढळून येत आहे. कोविडवर मात केल्यानंतर साधारणपणे ३ ते ६ आठवड्यांमध्ये MIS-C ची लक्षण दिसू लागतात. त्यामुळे MIS-C ची लक्षण दिसल्यास त्वरीत डॉक्टरांची भेट घेणं गरजेचं आहे. या आजारामध्ये शरीरावर सूज येते. त्यामुळे वेळीच उपचार न केल्यास हे प्रकरण जीवावर बेतण्याचीही शक्यता आहे, असं डॉ. प्रभात माहेश्वरी यांनी सांगितलं.

ही आहेत MIS-C ची लक्षणे -

१. २४ तासांपेक्षा जास्त वेळ ताप राहणे.

२. डायरिया होणे.

३. छातीत दुखणे.

४. डोळे लाल होणे.

५. शरीरावर लाल रंगाचं पुरळ उठणे.

६. अंगावर सूज येणे. (खासकरुन ओठ व जीभेवर सूज येणे.)

७. पोटदुखी, डोकेदुखी

८. थकवा येणे.

९. हृदयाच्या ठोक्यांचा वेग वाढणे.

१०. चक्कर येणे.

उपचारपद्धती-

MIS-C ची लक्षण जाणवल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा. तसंच या आजाराचं निदान करण्यासाठी काही ब्लडटेस्ट, छातीचा एक्स -रे, हृदयाचा इकोकार्डिओग्राफी अशा काही चाचण्या केल्या जातात. त्यानंतर MIS-C चं निदान झाल्यास डॉक्टर शरीरातील दाह किंवा पुरळ कमी करणारे औषधे देतात. तसंच हृदय, किडनी या अवयवांना नुकसान पोहोचू नये यासाठीही काही औषधे देतात. मात्र, जर मुलांची परिस्थिती अतिगंभीर असेल तर त्यांना बालरोगतज्ञांच्या देखरेखीखाली अतिदक्षता विभागात (आयसीयू) ठेवावं लागतं.

रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे होतोय MIS-C?

लहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यास हा आजार होऊ शकतो. कोरोना काळात अनेकदा आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली असते. त्यामुळे हा नवा आजार लवकर होण्याची शक्यता आहे. या आजारामध्ये हृदय, किडनी, रक्तदाब यांच्यावर परिणाम होतो.

loading image