esakal | संजय दत्तला झालेला कॅन्सर आहेतरी कोणता?  कोणत्या व्यक्तींना आहे या कॅन्सरचा धोका?.. वाचा महत्वाची माहिती 
sakal

बोलून बातमी शोधा

what is lungs cancer and what are the symptoms of it read full story

सोशल मीडियावर त्याच्या पोस्टनंतर.  बातमीने पुष्टी दिली की संजय दत्त स्टेज 3 फुफ्फुसांच्या कर्करोगाने ग्रस्त आहे. पण हा कॅन्सर आहे तरी कोणता? कशामुळे होऊ शकतो हा रोग? 

संजय दत्तला झालेला कॅन्सर आहेतरी कोणता?  कोणत्या व्यक्तींना आहे या कॅन्सरचा धोका?.. वाचा महत्वाची माहिती 

sakal_logo
By
अथर्व महांकाळ

नागपूर : अभिनेता संजय दत्त आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीमुळे, अभिनयामुळे प्रसिद्ध आहे. काही दिवसांपासून संजय दत्तची प्रकृती ठीक नसल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यानंतर संजय दत्त रुग्णालयात दाखल झाला होता. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना  चांगलाच धक्का बसला होता. त्याची कोविडसाठी  चाचणी निगेटिव्ह आली आणि लवकरच त्याला डिस्चार्ज मिळाला, त्यानंतर सोशल मीडियावर त्याच्या पोस्टनंतर.  बातमीने पुष्टी दिली की संजय दत्त स्टेज 3 फुफ्फुसांच्या कर्करोगाने ग्रस्त आहे. पण हा कॅन्सर आहे तरी कोणता? कशामुळे होऊ शकतो हा रोग? 

फुफ्फुसांचा कर्करोग म्हणजे काय? 

पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्येही कर्करोगाचे प्रमाण असते.  कर्करोगाच्या रुग्णांच्या सर्वाधिक मृत्यूंमागे मुख्य कारणांपैकी फुफ्फुसाचा कर्करोग हे प्रमुख कारण आहे. एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील पेशी नियंत्रणाबाहेर वाढतात तेव्हा कर्करोग होतो. कर्करोग फुफ्फुसांमध्ये सुरू होतो तेव्हा त्याला फुफ्फुसांचा कर्करोग असे म्हणतात. हा कर्करोग  शरीरातील लिम्फ नोड्स किंवा इतर अवयवांमध्ये पसरतो.  आणि बर्‍याच वेळा कर्करोग, जो मूळत: दुसर्‍या अवयवात सुरु होतो तो फुफ्फुसात देखील पसरतो.

अधिक माहितीसाठी - इम्युनिटी ठेवा मजबूत, व्यायाम करा टाइट  तरच कोरोनाशी फाईट; डॉक्टर म्हणतात हे करा आणि वाढवा इम्युनिटी

फुफ्फुसांच्या कर्करोगाविषयी महत्वाच्या गोष्टी  

धुम्रपानाच्या धूराच्या संपर्कात असणार्‍या लोकांना फुफ्फुसाचा कर्करोग देखील होऊ शकतो. धूम्रपान करताना फुफ्फुसांच्या आवरणाच्या पेशींचे नुकसान होते. सिगरेटमध्ये कार्सिनोजेन असतात जे शरीरासाठी घातक असतात. 

कर्करोगाच्या अवस्थेचे निदान तीन मुख्य निकषांद्वारे केले जाते ज्याला 'टीएनएम' म्हणतात.  टी म्हणजे ट्यूमर, एन म्हणजे नोड आणि एम मेटास्टेसिस होय.  हे ट्युमर किती मोठे आहे, ते कुठे आहे, लिम्फ नोड्स (एन) च्या जवळ किती आहे आणि मूळ जागेपासून (एम) कर्करोग किती दूर पसरला आहेहे यात तपासले जाते. 

स्टेज 3 कॅन्सर तीन गटात विभागले जाऊ शकते.  ट्यूमर हा फक्त फुफ्फुसात असताना स्टेज ए असतो.  याचा परिणाम कदाचित जवळच्या ऊतींवर झाला असतो आणि इतर अवयवांपर्यंत पोहोचला आहे.  स्टेज बीमध्ये एकाच फुफ्फुसात ट्यूमर असतात परंतु ते कॉलरबोनच्या वरच्या लिम्फ नोड्सपर्यंत पसरले असतात आणि छातीच्या दुस-या बाजूला देखील पसरले असू शकतात.

अधिक वाचा - ग्राहकांनो खुशखबर! सोने- चांदीच्या भावात तब्बल इतक्या हजारांची घसरण; खरेदीसाठी ‘अच्छे दिन'

सुरुवातीच्या अवस्थेत असताना फुफ्फुसांचा कर्करोग कोणतीही लक्षणे दर्शवत नाही. सतत खोकला येणे, खोकल्यातून रक्त पडणे, धाप लागणे,छाती दुखणे, वजन कमी होणे, हाडांमध्ये वेदना होणे ही लक्षणे  कायमस्वरुपी असली तर डॉक्टरचा  सल्ला नक्की घेणे आवश्यक आहे. 

loading image