White Fungus: म्युकोरमायकोसिसनंतर आणखी एक नवा आजार; जाणून घ्या लक्षणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fungus

White Fungus: म्युकोरमायकोसिसनंतर आणखी एक नवा आजार

कोरोना विषाणू, म्युकोरमायकोसिस ( काळी बुरशी) या गंभीर आजारांनंतर आता व्हाइट फंगस (white fungus) या नव्या आजाराने डोकं वर काढलं आहे. हा आजार म्युकोरमायकोसिसपेक्षाही अधिक गंभीर असल्याचं म्हटलं जात आहे. अलिकडेच बिहारमध्ये व्हाइट फंगसचे चार नवे रुग्ण आढळून आले आहे. या चारही रुग्णांना पटना मेडिकल कॉलेजमध्ये (PMCH) उपचारांसाठी दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कोरोना व म्युकोरमायकोसिसचं संकट असतांनाच हा नवा आजार समोर आल्यामुळे सर्वत्र भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. म्हणूनच 'व्हाइट फंगस' म्हणजे काय किंवा त्याची लक्षणे कोणती ते जाणून घेऊयात. (white fungus what is it is it more dangerous than black fungus and what are the- symptoms)

व्हाइट फंगस हा ब्लॅक फंगसपेक्षा जास्त धोकादायक असून त्याचा परिणाम त्वचा, पोट, मूत्रपिंड, मस्तिष्क, फुफ्फुस या अवयवांवर होतो. सध्या तरी केवळ बिहारमध्ये याचे रुग्ण आढळले असून अन्य राज्यांमध्ये या विषाणूचा रुग्ण न आढळल्याचं सांगण्यात येत आहे.

हेही वाचा: ऑक्सिजन देणारी 5 झाडं माहित आहेत का?

व्हाइट फंगसची लक्षणे कोणती?

१. कोरोनाप्रमाणेच या आजाराची लक्षणं आहेत. परंतु, रुग्णाची कोरोना चाचणी मात्र निगेटिव्ह येते. त्यावेळी त्याला व्हाइट फंगस झाल्याची शक्यता असते.

२. व्हाइट फंगस झाल्याची शक्यता असल्यास HRCT स्कॅन करणं अत्यंत गरजेचं आहे.

३. रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.

४. ऑक्सिजन लेव्हल खालावते

कोरोना इतकाच घातक आहे व्हाइट फंगस

तज्ज्ञांच्या मते, व्हाइट फंगस कोरोनाइतकाच घातक आहे. सध्या तरी या आजारामुळे कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाल्याचं समोर आलेलं नाही. मात्र, या काळात काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.

loading image
go to top